मराठी पाऊल का अडखळते ?

'मराठी माणसाच्या महत्वकांक्षा बोथट झाल्या आहेत का?', 'बरं चाललं आहे की, कितीही मिळालं तरी कमीच असतं' ह्या विचारपद्धतीत मराठी माणूस अडकला आहे का ?, 'उत्तुंग काही तरी करावं, घडवावं अशी एकूणच मराठी समूह मनाची इच्छाच संपली आहे का?' लेखाच्या सुरुवातीलाच तीन प्रश्न जे काहीसे अप्रिय, आणि राग आणणारे वाटतील पण एकूणच चित्र बघितलं तर हे मान्य करायला कितीही जड गेलं ,तरी हे वास्तव आहे. काहीतरी मिळवण्याच्या किंवा घडवण्याच्या महत्वकांक्षेच्या स्पर्धेत एकूणच मराठी समाज मागे पडत चालला आहे. ह्यात आत्ता अगदी सुरुवातीलाच सांगतो की जे जे मुद्दे मी उपस्थित करणार आहे, त्यात सन्माननीय अपवाद आहेत आणि त्या माणसांविषयीचं कौतुक आणि कृतज्ञता हे दोन्ही आहे. पण म्हणून प्रत्येक क्षेत्रांत हाताच्या बोटावर मोजण्याइतके लोकं हेच जर आपलं यश मानत असू तर मात्र मराठी समूहमनाला आत्मपरीक्षणाची गरज आहे. ह्यात मराठी म्हणजे कोण, इथे पिढ्यानपिढ्या राहिलेले, वालचंद परिवार, फिरोदिया, बजाज ह्यांना आपण मराठी मानून आणि ते कसे उत्तम मराठी बोलतात इत्यादी बाबींवर समाधान मानून त्यांना आपलं म्हणा, ह्या खटपटीत ...