
वाजपेयीजी, ये दिल मांगे मोअर... 'ये दिल मांगे मोअर' हे पेप्सी कंपनीच्या १९९८ सालच्या कॅम्पेनचं घोषवाक्य (tagline). पेप्सी सारख्या कंपन्या ह्या टॅगलाईन पासून पूर्ण कॅम्पेन करताना, तात्कालीन राजकीय आणि सामाजिक परिस्थितीच्या अभ्यास करतात, टॅगलाईनचं टेस्टिंग करून बघतात आणि मगच ती कॅम्पेन बाहेर येते. १९९८ साली देशाचा काहीसा मूड हा 'ये दिल मांगे मोअर' असाच होता. भारतीय स्वातंत्र्याला पन्नास वर्ष नुकतीच पूर्ण झाली होती. आणि नरसिंहराव आणि मनमोहन सिंग ह्या जोडीने आणलेल्या उदारीकरणाच्या पर्वाला ७ वर्ष होऊन गेली होती. उदारीकरणाला विरोध करणारे आवाज बसायला लागले होते आणि उदारीकरणाने भारतात नवा मध्यमवर्ग उदयाला यायला सुरुवात झाली होती किंवा मी म्हणेन किमान त्यांची स्वप्न मोठी होऊ लागली होती. त्यावेळेस मला आठवतंय त्याप्रमाणे कॉलेजच्या अगदी पहिल्या वर्षी सुद्धा कॉलेजच्या मुलांमध्ये कॉमर्स ग्रॅज्युएट होऊन बँकेत नोकरी करण्यापेक्षा सीए होऊ, एमबीए होऊ किंवा अगदीच काही नाही तर एक्स्पोर्ट मॅनेजमेंट करू इत्यादी स्वप्न बघायला सुरुवात झाली होती. गळ्यात 'I am cool' असं काही तरी...