वाजपेयीजी, ये दिल मांगे मोअर...
'ये दिल मांगे मोअर' हे पेप्सी कंपनीच्या १९९८ सालच्या कॅम्पेनचं घोषवाक्य (tagline). पेप्सी सारख्या कंपन्या ह्या टॅगलाईन पासून पूर्ण कॅम्पेन करताना, तात्कालीन राजकीय आणि सामाजिक परिस्थितीच्या अभ्यास करतात, टॅगलाईनचं टेस्टिंग करून बघतात आणि मगच ती कॅम्पेन बाहेर येते.
१९९८ साली देशाचा काहीसा मूड हा 'ये दिल मांगे मोअर' असाच होता. भारतीय स्वातंत्र्याला पन्नास वर्ष नुकतीच पूर्ण झाली होती. आणि नरसिंहराव आणि मनमोहन सिंग ह्या जोडीने आणलेल्या उदारीकरणाच्या पर्वाला ७ वर्ष होऊन गेली होती. उदारीकरणाला विरोध करणारे आवाज बसायला लागले होते आणि उदारीकरणाने भारतात नवा मध्यमवर्ग उदयाला यायला सुरुवात झाली होती किंवा मी म्हणेन किमान त्यांची स्वप्न मोठी होऊ लागली होती.
त्यावेळेस मला आठवतंय त्याप्रमाणे कॉलेजच्या अगदी पहिल्या वर्षी सुद्धा कॉलेजच्या मुलांमध्ये कॉमर्स ग्रॅज्युएट होऊन बँकेत नोकरी करण्यापेक्षा सीए होऊ, एमबीए होऊ किंवा अगदीच काही नाही तर एक्स्पोर्ट मॅनेजमेंट करू इत्यादी स्वप्न बघायला सुरुवात झाली होती. गळ्यात 'I am cool' असं काही तरी लिहिलेलं लॉकेट घालून फिरणारा शाहरुख खान कुछ कुछ होता है म्हणत होता आणि कॉलेजमध्ये तसली लॉकेट घालून फिरणारी मुलं स्वतःला कुल म्हणत होती. लँडलाईन फोन घराघरांमध्ये स्थिरावले होते आणि टीव्हीचा प्रवास ब्लॅक अँड व्हाईट कडून कलर टीव्ही कडे सुरु होता. सांता बार्बारा का अश्याच काहीश्या नावाची इंग्रजी टीव्ही सिरीयल त्यावेळच्या स्टारच्या इंग्रजी वाहिनीवर होती आणि अगदी दूरदर्शनने सुद्धा extra marrital affairs आणि भरपूर मसाला असलेली स्वाभिमान सिरीयल आणून प्रेक्षकांच्या बदलत्या टेस्टला साजेशी सिरीयल आणायचं धाडस दाखवलं होतं. चायनीज पदार्थ हे लोकप्रिय होऊ लागण्याचा काळ. थोडक्यात भारतीय समाज कात टाकत होता किंवा सोप्या भाषेत सांगायचं तर आधुनिक होत होता.
पण ह्या सगळ्या बदलाच्या काळात पण अगदी गळ्यात 'I am cool' असं लिहिलेलं लॉकेट घालून फिरणारा कॉलेजमधला मुलगा पण टीव्हीवरती 'धोतर, कुर्ता आणि जॅकेट' अश्या अगदीच पारंपरिक भारतीय वेशात असणाऱ्या नेत्याचं भाषण टीव्हीवरती मनापासून ऐकायचा, त्यांना पंतप्रधान म्हणून स्वीकारायची त्याची तयारी होती.तो नेता म्हणजे अटल बिहारी वाजपेयी. अटलजी जेंव्हा १३ दिवसाच्या आणि १३ महिने टिकलेल्या सरकारांचे पंतप्रधान होते तेंव्ह सुद्दा ते वयाने ७० च्या पार होते आणि १९९९ ला जेंव्हा ते पुन्हा सत्तेत आले तेंव्हा त्यांनी पंचाहत्तरी पार केली होती. 'ये दिल मांगे मोअर' म्हणणाऱ्या पिढीला वाजपेयी पंतप्रधान म्हणून चालत होते किंवा हवे होते. दुखऱ्या गुडघ्यांनी संथ चालणारे आणि कदाचित त्याहून संथ बोलणाऱ्या अटलजींची लोकप्रियता ही आत्ता जशी नरेंद्र मोदींची आहे तशीच होती. फक्त फरक इतकाच मोदींना ही लोकप्रियतेचा डोंगर उभा करायला आणि तो भुसभुशीत होऊ लागल्यावर तो टिकवायला जी प्रचंड मेहनत करावी लागत आहे ती अटल जी ना कधीच करावी लागली नाही.
ह्याला कारण मला वाटतं वाजपेयीजी अंतर्बाहय आधुनिक होते. अविवाहित राहणं हा एखाद्या व्यक्तीचा चॉईस असू शकतो हा वेस्टर्न थॉट, त्यामुळे त्याच भांडवल करायची गरज नाही, ह्याच त्यांना भान होतं. मला एक मानस कन्या आहे आणि तिचं कुटुंब, तिच्या आईसकट माझ्यासोबत राहतं हे जाहीरपणे स्वीकारणं ह्याला मॉडर्नपणा म्हणता येईल तो त्यांच्याकडे होता.
मला बिअर आवडते असं खुलेपणाने सांगणारे ७५ वर्षांचे आजोबा हे मॉडर्न होते, कारण त्यांना स्वतःच्या आवडी लपवायची गरज नाही वाटलं, त्यामुळेच प्रवीण तोगडिया ते हिंदू जागरण मंच सारख्या संघटना तेजीत असताना देखील कशावरच बंदी घातली नाही, किंवा ह्या संघटनांना डोक्यावर घेतलं नाही.
जसं 'कुल' लिहिलेलं लॉकेट गळ्यात घातल्याने माणूस 'कुल' होत नसतो, तसंच युद्ध करून शेजारचं राष्ट्र संपवेन असं बोलणारा माणूस हा देखील शूर नसतो. वाजपेयी जी असल्या शूरपणाच्या आहारी कधीच गेले नाहीत, त्यांनी कारगिल जिंकून दाखवलं, पण ९९ डिसेंबरला कंदाहारला IC ८१४ हे इंडियन एअरलाईन्सचं विमान हायजॅक केल्यावर त्यांनी प्रवाश्यांच्या सुटकेसाठी अतिरेकी देखील सोडून दिले. कुठलाच अभिनिवेश न बाळगल्यामुळे असेल पण वाजपेयींना युद्ध जिंकता आलं आणि तहात माघार घ्यावी लागली तरी ते पुढे शांतपणे कारभार करू शकले.
अमेरिकेत मोनिका ल्युएन्स्की बरोबरच्या भानगडींमुळे चर्चेत आलेला पण देखणा राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन एका बाजूला तर दुसरीकडे तितकंच देखणं व्यक्तिमत्व असलेले टोनी ब्लेअर ब्रिटनचे पंतप्रधान असताना देखील ७५ वर्षाचे वाजपेयी ज्या कमालीच्या आत्मविश्वासाने युनाटेड नेशन्समध्ये फिरायचे ते प्रेक्षणीय असायचं. वाजपेयींना कधीच न्यूयॉर्कच्या टाइम स्क्वेअर मध्ये स्वतःच्या नावाचा जयघोष करून घ्यावासा वाटला नाही. आणि जर त्यांना चुकून इच्छा झाली असतीच तर प्रमोद महाजन नावाच्या हनुमानाने ते १९९९ लाच करून दिलं असतं. जो आत्मविश्वास त्यांच्यात असायचा त्यापुढे अमेरिका आणि इंग्लंड ह्या महासत्तेचे नेते सुद्धा त्यांच्यापुढे नम्र असायचे.
गुडघ्याच ऑपरेशन न लपवता त्यांनी ते जाहीरपणे करून घेतलं आणि पुन्हा ते नव्या जोमाने उभे राहिले. पण हे सगळं accept होत होतं. भारतीय मध्यमवर्गीय चाळीतून वन रूम किचन मध्ये शिरायला लागला होता, त्याच्याकडे 'बुलंद भारत की बुलंद तसबीर' च्या बजाजची स्कुटर जाऊन 'हिरो होंडा' आली होती. दहा घरांमागे एक मुलगा अमेरिकेत किंवा इंग्लंड मध्ये जायला लागला होता खरा पण ते रुटीन झालं नव्हतं. भारतीय मध्यमवर्गाची लाईफस्टाईल बदलत होती पण माज यावा इतका पैसा हातात यायचा होता, ट्रॅव्हल कंपन्यांच्या बरोबर १० दिवसात युरोपातले ११ देश फिरून आम्ही जग बघितलं आहे, त्यामुळे आम्हाला सगळं कळतं हा मध्यमवर्गीय अहंकार शिरला नव्हता, आणि मोठ्यांना उलट बोलायचं नसतं असं सांगणारी पिढी तो पर्यंत हयात होती.
२००४ ला वाजपेयींच्या जागी मनमोहनसिंग आले. शाळेत किंवा कॉलेजमध्ये एखादे अतिहुशार पण इंटरेस्टिंग पद्धतीने शिकवण्याची कला अंगी नसलेले प्रोफेसर जसे असतात तसे काहीसे मनमोहन सिंग होते. अशा प्रोफेसरच्या लेक्चर्सना आम्ही बंक केलं, पण ते मूर्ख आहेत, त्यांना अक्कल नाही असं म्हणलं नाही. पण २००४ नंतरची पिढी ही दुसऱ्याची 'अक्कल काढणारी' आणि 'arrogant' पिढी आली आणि आयुष्यभर कुठल्या ना कुठल्या inferiority complex मध्ये जगलेल्या parents ना त्यांच्या 'हम हे नये अंदाज क्यों हो पुराना' स्टाईल आवडू लागली, इतकंच नाही तर ते कळत नकळत त्याला प्रोत्साहन देऊ लागले.
२००२ चा दिल चाहता है हा त्या दशकाचा कल्ट सिनेमा होता. घरी न सांगता गोव्याला निघून जाणं आणि ऑलरेडी एंगेज्ड असलेली मुलगी माझ्या आयुष्यात येत नाही म्हणून 'तनहाई... " म्हणत रडणारी पिढी पुढे येऊ लागली. त्यांना वाजपेयींच्या पेक्षा दिल चाहता हे मधल्या आकाश (आमिर खान) सारखा बडबड करणारा आणि स्वतःची किरकोळ दुःख पण मॅग्निफाय करणारी characters आवडणार असं दिसायला लागलं.
त्यामुळे वाजपेयी जी ना तब्येतीमुळे २००६ नंतर exit घ्यावी लागली ते बरंच झालं. कारण त्यांना हा मॉडर्न अप्रोच फारच भुसभुशीत वाटला असता. आज सगळीकडे शोकसंदेश लिहिले जात आहेत की आज वाजपेयींची गरज जास्त आहे इत्यादी इत्यादी. पण मला विचाराल तर वाजपेयीजी हो एका बाजूला वाटतं की ये दिल मांगे मोअर पण people deserve their own leader. सध्या आम्ही तुम्हाला नक्कीच deserve करत नाही
केतन जोशी

Comments
Post a Comment