
भारतीय जनता पक्षाचा मेगा डिस्काउंट सुरु? २०१४ ला भारतीय जनता पक्षाचे केंद्रात २८२ खासदार निवडून आले. एकदा इतके खासदार निवडून आल्यावर, ह्या आकड्याची आम्हाला खात्रीच होती इत्यादी दावे जरी त्या पक्षाच्या नेत्यांनी केले असले तरी त्यांना देखील ह्या आकड्याची खात्री नसणार हे नक्की. कारण आपण स्वतःच्या ताकदीवर २७५ चा आकडा गाठू शकतो ह्याची खात्री जर तेंव्हाच्या नेतृत्वाला, म्हणजे नरेंद्र मोदी ज्यांचं नाव पुढे करून भाजप निवडणूक लढवत होते त्या मोदींनी जवळपास देशातल्या निम्म्याहून राज्यात घटक पक्षांचं लोढणं अंगावर घेतलं नसतं. उत्तर प्रदेशात अपना दल सारखा अगदी छोटा पक्ष पण त्यांनी सामावून घेतला ह्यावरून जशी त्यांना खोटी सर्वसमावेशकता दाखवायची होती तसंच स्वबळावर येण्याचा कॉन्फिडन्स देखील नव्हता. १६ मे ला निकाल लागले, भारतीय जनता पक्षाचे २८२ खासदार निवडून आले आणि नरेंद्र मोदींचा नूर बदलला. भाजपच्या नेतृत्वाचा वारू चौफेर उधळला आणि एनडीएचं सरकार आलं असं जरी म्हणलं तरी ते भाजपचंच सरकार राहील ह्याची खबरदारी श्री. नरेंद्र मोदी आणि पुढे जाऊन श्री. अमित शाह ह्यांनी घेतली. एनडीएचे समनव्यक हे श्री. चं...