काहीही न करता !
बारावीची परीक्षेला अवघे काही आठवडे राहिलेले असताना आमच्या फॅमिली डॉक्टरनी विचारलं, सुट्टीत काय करणार? म्हणलं काही ठरलं नाही. तर म्हणाले छान उगाच ठरवत बसण्यात एनर्जी कशाला घालवायची. मग म्हणाले की 'विपश्यनेला' जा. काय असतो हा प्रकार हे फार त्यांनी खोलात जाऊन सांगितलं नाही. एवढंच कळलं की बोलायचं नाही १० दिवस. परीक्षा झाली आणि तात्काळ विपश्यनेला गेलो. पहिल्याच दिवशी संध्याकाळी कोणीच कोणाशी बोलायचं नाही अशी शपथ घ्यायला लावली. आणि मग विपश्यना शिकवायला सुरु केलं. दिवसभर तसं काहीच करायचं नाही असं म्हणलं तरी चालेल, विपश्यनेची साधना करायची. म्हणजे काय तर दिलेल्या जागी बसायचं, डोळे मिटायचे आणि शरीरात होणारे बदल अनुभवायचे. माझ्या वाट्याला आलेले गुरु पण मस्त होते. त्यांना मज्जा वाटली की १८ वर्षांचा मुलगा विनातक्रार येऊन बसतो. मला म्हणाले की डोळे नाही मिटावेसे वाटले तरी हरकत नाही. नुसतं बसून रहावसं वाटलं तरी चालेल. म्हणलं हे भारी आहे. ते १० दिवस भुर्रकन उडून गेले. पुढे कॉलेज, मास्टर्सचं शिक्षण, नोकऱ्या सगळं सुरु झालं पुन्हा अशी संधी आलीच नाही. हां एक फायदा नक्की झाला त्या १०...