पेगासस अदृश्य पण अघोरी हेर
ketalaytics च्या आजच्या ह्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं मनापासून स्वागत. आजचा विषय आहे पेगासस.
पेगासस सॉफ्टवेअर भारताने विरोधकांवर वापरलं का नाही वापरलं ह्यावर भारतात चर्चा सुरु असताना हे प्रकरण नक्की काय आहे? आणि हे किती खोल आहे हे समजवून घ्यावं लागेल. बातमी मागची बातमी समजून नाही घेतली तर उपयोग काय. आणि हेच तर ketanalytics चं काम आहे. चला तर मग पेगाससचा शोध घेऊया.न्यूयॉर्क टाइम्सने २८ जानेवारी २०२२ च्या अंकात 'The Battle for the World's Most Powerful Weapon' ह्या अतिदीर्घ लेखात पेगासस हे इस्रायली सॉफ्टवेअर वापरून भारत सरकारने भारतातील अनेकांचे मोबाईल्स हॅक करून त्यातून अत्यंत खाजगी माहिती, फोटोज, लोकेशन्स, अशी अनेक माहिती मिळवली असा आरोप केला. त्यावर अर्थातच विरोधी पक्षात असलेल्या काँग्रेसने सरकारला जाब विचारला. पण ही बातमी पुढे फारशी कुठे चर्चेत आली नाही. अर्थात न्यूयॉर्क टाइम्स हे कसं भारतद्वेष्ट वर्तमानपत्रं आहे ह्याचे मेसेजेस पसरवले गेले. आणि जणू काही न्यूयॉर्क टाइम्सने त्यांच्या ह्या अतिदीर्घ लेखांत फक्त आणि फक्त भारताबद्दलची माहिती लिहून त्यांची बदनामी केली आहे असा सूर आळवला जाऊ लागला. अर्थात व्हाट्सअपवर जे येतं ते सत्यच असतं असं मानण्याची पद्धतच आहे. त्यामुळे ते खरं मानलं गेलं आणि पुढे पण मानलं जाईल. पण हा पूर्ण लेख आणि एकूणच पेगासस प्रकरण नीट अभ्यासल तर लक्षात येतं की ह्या सॉफ्टवेअरने जगात गेले एक दशक धुमाकूळ घातला आहे. ह्या सॉफ्टवेअरच्या ताकदीच्या जोरावर इस्रायलने डिप्लोमसीच्या जगात उलथापालथ केली आणि जागतिक पटलावर कधीही विचार न केलेल्या युत्या जन्माला आल्या.
कसं ते बघूया...
मोबाईल हॅकिंगच्या प्रचलित पद्धती कोणत्या? एखादी अनोळखी लिंक मोबाईलवर येते आणि त्यावर क्लिक केलं की एखादा व्हायरस मोबाईलमध्ये शिरतो आणि आतला डेटा हॅक व्हायला सुरु होतो. एनएसओचं पेगासस हे हॅकिंग सॉफ्टवेअर हे ह्या सगळ्याच्या पुढे आहे. इथे कोणत्याही क्लिकशिवाय मोबाईल हॅक होतो. आतला सगळा डेटा, फोटोज, मेसेजेस,लोकेशन सगळं लाईव्ह ट्रॅक करता येतं. इतकंच काय तर मोबाइलमधला कॅमेरा देखील आपोआप ऑन करता येतो.
ह्या एनएसओचा जन्म एका कोंबड्यांच्या खुराड्यातल्या. इस्रायलच्या तेल अव्हीवच्या जवळ एका कोंबड्यांची पैदास करणाऱ्या कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या जागेत ह्याची सुरुवात झाली. शालेव हुलीओ, ओमरी लेव्ही, आणि निव्ह कार्मी ह्या तिघांच्या नावाच्या इनिशियल्समधून NSO हे ह्या ग्रुपचं नाव पडलं. सुरुवातीला ग्राहकांच्या परवानगीने त्यांच्या मोबाईलचा ताबा घेणारं एक सॉफ्टवेअर त्यांनी तयार केलं आणि त्यातून ह्या उलथापालथीची सुरुवात झाली. इतकी वर्ष जगभरातल्या इंटेलिजन्स एजन्सीजना मोबाईल मध्ये कसं शिरायचं ह्याच तंत्रज्ञान मिळालं होतं पण आतमधला डेटा एन्क्रिप्ट व्हायच्या आधी कसा मिळवायचा हे कळत नव्हतं. पण ह्या एनएसओने त्यांचा हा प्रश्नच सोडवून टाकला. ह्या कंपनीच्या ऑफिसमध्ये बसून ७०० कर्मचारी दिवसरात्र अँड्रॉइड आणि ऍप्पलच्या फोन्सना आणि अर्थात ब्लॅकबेरी तंत्रज्ञानाला कसं हॅक करायचं ह्या कामात गुंतले होते आणि त्यांना क्रॅक सापडले होते. आता प्रश्न होता क्लायंट कसे मिळवायचे. ह्या कामात निव्ह कार्मी हा पार्टनर कामी येणार होता, इस्रायली मिल्ट्री इंटेलिजन्सचा भाग होता आणि मोसादमध्ये पण काम करायचा. कंपनीने आधीच ठरवलं होतं की सॉफ्टवेअर विकायचं तर फक्त देशांना कुठल्या खाजगी कंपनीला विकायचं नाही. पण देशांना विकायचं तर कुठल्या देशांना विकायचं, मग ठरलं की युरोपमधल्या देशांना विकूया. पण इस्रायली सॉफ्टवेअर म्हणल्यावर ते नक्की काय उपद्व्याप करतील ह्याची युरोपियन देशांना खात्री नव्हती त्यामुळे सुरुवातीला ग्राहक मिळेना. मग ह्या कंपनीला एक विश्वासू चेहरा हवा होता जो मेजर जनरल अव्हिगडोर बेन गॅल ह्यांच्या रूपाने मिळाला, इस्रायली आर्मीतील खूप मोठं नाव हे.
हे सॉफ्टवेअर कोणत्या देशांना विकायचं आणि ते विकताना इस्रायली डिफेन्स मिनिस्ट्रीला विश्वासात घ्यायचं असं धोरण मेजर जनरल बेन गॅल ह्यांनी ठरवलं होतं. इस्रायल सरकारलाच इन्व्हॉल्व करून घेतल्यावर अनेक देशांशी व्यवहार करणं कठीण होईल ह्यांची जाणीव बेन गॅलना होती पण विषय नाजूक होता त्यामुळे त्यांनी होऊ शकणाऱ्या नुकसानाकडे दुर्लक्ष करायचं ठरवलं. मग हळूच इस्रायलच्या पंतप्रधानांकडे ह्या सॉफ्टवेअरची महती पोचली आणि डिप्लोमॅटिक जगात ह्या सॉफ्टवेअरच्या जीवावर खूप काही पदरात पाडून घेता येईल ह्याची जाणीव मोसाद्ला आणि नेत्यानयाहू ह्यांना झाली.
कंपनीला पहिला मोठा क्लायंट मिळाला मेक्सिको. मेक्सिकन सरकारला ड्रग्स कार्टेलच्या ब्लॅकबेरी नेटवर्कमध्ये शिरायचं होतं. एल चापो ह्या मेक्सिकोमधल्या सगळ्यात मोठ्या ड्रग माफियाच्या टोळीतील एका माणसाच्या मोबाईलमध्ये शिरून दाखवत एनएसओने मेक्सिकन सरकारला खिशात टाकलं. एनएसओच्या सॉफ्टवेअरची कमाल दिसायला लागल्यावर मेक्सिको युनायटेड नेशन्समध्ये इस्रायलची बाजू घ्यायला लागला. दोन्ही देशांचे पंतप्रधान एकमेकांच्या देशांना भेट देऊ लागले आणि पुढे चक्क मेक्सिकोने युनायटेड नेशन्समध्ये पॅलेस्टाईनच्या बाजूने येणाऱ्या ठरावांना उघड विरोध करायला सुरुवात केली. हा चमत्कार होता एनएसएसोच्या सॉफ्टवेअरचा.
सुरुवातीला ड्रग कार्टेल्सच्या विरोधात हे सॉफ्टवेअर मेक्सिकन सरकारने वापरलं पण अर्थात पुढे इतकं प्रभावी शस्त्र हाती आल्यावर स्वतःच्या देशातील मानवी हक्क कार्यकर्ते, विरोधक, वकील, पत्रकार ह्यांच्यावर सर्रास पाळत ठेवायला सुरु झाली.
पुढचा देश होता २०१० साली दक्षिण अमेरिकेतला पनामा. टीचभर देश. पण युनायटेड नेशन्समध्ये इस्रायलच्या बाजूने ठाम उभा राहणारा. त्यामुळे ह्या देशाचा अध्यक्ष रिकार्डो मार्टिनेली ह्यांना त्यांच्या इस्रायल दौऱ्यात एकदम ग्रँड वेलकम दिलं गेलं. आणि अर्थात पनामाने इस्रायलला दिलेल्या पाठींब्याची किंमत वसूल करून घेतली ती शस्त्रास्त्र आणि अर्थात पेगासस सॉफ्टवेअर्स पदरात पाडून घेऊन. एकदा हे पदरात पडलं आणि पनामातील विरोधकांचे ब्लॅकबेरी मेसेजेस वाचता येतात हे कळल्यावर तर पनामाने इस्रायलसमोर इतकं लोटांगण घातलं की इस्रायल विरोधात एखादा ठराव आला असेल आणि जगातील बहुसंख्य देश जरी ठरावाच्या बाजूने मतदान करणार असतील तरी पनामा इमानेइतबारे इस्रायलची तळी उचलून धरायचा. अर्थात पनामाने पण ह्या सॉफ्टवेअरचा पुरेपूर गैरवापर केला.
ह्या दरम्यान जिबुटी (dijibuti ) ह्या आफ्रिकेमधल्या एका छोट्या देशाला जिथे मानवी हक्काचं सर्रास उल्लंघन होतं आणि ह्या सॉफ्टवेअरचा निव्वळ दुरुपयोग होणार ह्याची खात्री असताना पण अमेरिकेने ह्या छोट्याशा देशाला इस्रायलला हे सॉफ्टवेअर विकायला लावलं.
पुढे पोलंडचा राष्ट्राध्यक्ष व्हिक्टर ओब्रान ह्यांनी तातडीने सॉफ्टवेअर विकत घेतलं. आणि त्याची किंमत अर्थात इस्रायलला युनायटेड नेशन्समध्ये वाट्टेल तसा सपोर्ट देऊन चुकती केली गेली.
मुळात इस्रायलसाठी शस्त्रात्रांची निर्यात हा त्यांचा अर्थव्यवस्थेचा पाया आहे आणि त्यात हे असलं अघोरी अस्त्र हाती लागल्यावर इस्रायलने जगातील त्यांच्या कडवट विरोधकांना पण स्वतःकडे वळवून घ्यायला सुरु केली. त्यातली दोन महत्वाची उदाहरणं. पहिलं उदाहरण युएईचं.
२०१० साली मोसादने हमासच्या (पॅलेस्टाईनच्या मुक्ती संघर्षांसाठी लढणारी एक धार्मिक, राजकीय आणि स्वतःच सैन्य असणारी संघटना) एका एजंटला दुबईत मारलं. दुबईच्या भूमीवर हा प्रकार घडल्यामुळे तिथला राजपुत्र मोहम्मद बिन झायद हे प्रचंड संतापले. त्यांनी इस्रायलशी सर्व राजनैतिक संबंध तोडण्याचे आदेश दिले. आता युएईच्या राजपुत्राचा राग शांत करायला इस्रायलने २०१३ साली त्यांना पेगाससची जादू दाखवली आणि त्यांना सॉफ्टवेअर विकण्याचं आमिष दाखवलं. इंटेलिजन्स अर्थात दुसऱ्याच्या आयुष्यात डोकावण्याची संधी देणाऱ्या सॉफ्टवेअरपुढे इस्रायलने केलेला गुन्हा हा किरकोळ मानत युएई सगळं विसरायला तयार झाली. युएईने पण सर्रास तिथल्या राजवटीच्या विरोधात हे अस्त्र वापरून मानवी हक्काचं उल्लंघन करायला सुरु केलं.
दुसरा देश सौदी अरेबिया. ज्या पवित्र भूमीवरून अनेकदा जिहादचे नारे दिले गेले आणि इस्रायलचा कडवट विरोधक आणि अर्थात पॅलेस्टाईन लढ्याचा सहानुभूतीदार देश आणि त्यात पुन्हा तेलाचे प्रचंड साठे असलेला देश . २०१७ ला इस्रायलने सौदी अरेबियाला पेगासस विकण्याची परवानगी दिली. आणि त्याची फी घेतली तब्बल ५५ मिलियन डॉलर्स. पुढे २०१८ मध्येच वॉशिंग्टन पोस्टचा कॉलमनीस्ट आणि सौदी राजपुत्राचा मोहम्मद बिन सुलतानचा कट्टर विरोधक जमाल खशोगी ह्यांची हत्या इस्तंबूलमध्ये केली गेली. ह्या हत्येत संशयाची सुई सौदी राजपुत्राकडे होती आणि जमाल खशोगी ह्यांच्यावर पाळत ठेवण्यासाठी पेगाससचा वापर केला गेला हे पुढे उघड झालं असा आरोप आहे. पण अर्थात ह्याची पुष्टी कुठेच झालेली नाही. मुळात सौदीच्या राजपुत्राला आता कट्टरपंथीयांच्या जोखडातून सौदीला मुक्त करायचं आहे, आणि नवीन मित्र जोडताना आणि जुन्या शत्रूंशी हातमिळवणी करताना पेगासस हे कारण असेल तर हरकत काय ?
सौदी बरोबरचे संबंध टिकावेत, उलट ते वृद्धिंगत व्हावेत अशी इस्रायली पंतप्रधान बेंजमिन नेत्यान्याहू ह्यांची इच्छा होती त्यामुळे खशोगीच्या हत्येशी पेगाससचा काही संबंध नाही अशी क्लीनचिट कंपनीने दिली.
ह्या दरम्यान डिप्लोमॅटिक जगातील एक चमत्कार आकार घेत होता तो म्हणजे इस्रायल-युएई-सौदी-बहारीन ह्यांच्यात हातमिळवणी झाली आणि त्यात साक्षीदार अमेरिका सहभागी झाली. अर्थात ही हातमिळवणी करून देताना अमेरिकेने स्वतःचा फायदा काढून घेतला तो म्हणजे त्यांनी युएईला F ३५ जेट फायटर्स विकली. इतके दिवस मिडल इस्टमध्ये ही फायटर विमानं फक्त आणि फक्त इस्रायलकडे होती. आता अशी विमानं जर युएईकडे आली तर कधीतरी आमच्यावर ह्या विमानांचा प्रयोग होईल अशी भीती इस्रायलला वाटली. त्यांनी थयथयाट सुरु केला. मग इस्रायलने पेगाससचं लायसन्स रिन्यू करू पण युएईने ही जेट फायटर्स आमच्या विरोधात वापरणार नाही ह्याची लेखी ग्वाही द्यावी अशी अट घातली. युएई अमान्य करण्याची शक्यताच नव्हती.
पुढे २०१९ ला सौदीला दिलेल्या सॉफ्टवेअरचं लायसन्स एक्स्पायर व्हायला आलं. सौदी सरकारकडून एनएसओला फोन सुरु झाले. कंपनी टंगळमंगळ करत होती. शेवटी सौदी राजपुत्राने थेट इस्रायली पंतप्रधान बेंजामिन नेत्यान्याहूंना फोन केला. त्यांनी तात्काळ कंपनीला सॉफ्टवेअर लायसन्स रिन्यू करण्याचे आदेश दिले. अर्थात there are no free meals. इस्रायलने सौदी हवाईपट्टीवर स्वतःची विमानं उडवण्याचा अधिकार मिळवला. ज्या सौदीच्या भूमीवर अमेरिकन सैन्याने पाय ठेवला म्हणून तिथल्या जिहादींनी आणि पुढे ओसामा बिन लादेनने थयथयाट केला तिथे थेट काफिर म्हणजे चक्क इस्रायलची विमाने उतरणार? हो कारण पेगाससची जादू सौदी राजपुत्राने अनुभवली होती.
२०१७ मध्ये नरेंद्र मोदी इस्रायलच्या दौऱ्यावर गेले. बेंजमिन नेत्यान्याहू आणि नरेंद्र मोदी ह्यांचे समुद्रावर निवांत फिरतानाचे फोटो पब्लिश केले गेले. त्यात पेगासस आणि अनेक शस्त्रास्त्र ह्यांच २ बिलियन डॉलर्सचे डील केलं गेलं. आणि पुढे इस्रायलशी इतकी घट्ट मैत्री भारताची झाली की २०१९ ला युनाईटेड नेशन्समध्ये पॅलस्टीनला मानवी हक्क निरीक्षक म्हणून मान्यता मिळावी असा प्रस्ताव आला त्याला विरोध करणाऱ्यांमध्ये भारत देखील होता.
हे सॉफ्टवेअर फक्त अतिरेकी कारवायांसाठी वापरू इत्यादी जरी जगभरातील देशांनी सांगितलं तरी त्याचा सर्रास वापर हा पत्रकार, मानवी हक्क कार्यकर्ते, वकील आणि अर्थात राजकीय विरोधक ह्यांच्यावर केला गेला आहे. आणि ह्याला जगातील कोणताच देश अपवाद नाही.
ह्या पेगासस नाट्यातला अगदी ताजा अंक म्हणजे अमेरिकेला इराणसोबतचा अणुकरार पुनुरुज्जीवीत करायचा आहे. पण इस्रायल सध्या सुन्नी मुस्लिम देशांसोबत म्हणजे सौदी अरेबिया आणि युएई सोबत तुझ्या गळा माझ्या गळा करत असल्यामुळे शियाबहुल इराण सोबतच्या कराराला इस्रायल अपशकुन करेल अशी भीती अमेरिकेला आहे. त्यामुळे जो बायडेन प्रशासनानाने पेगासस सॉफ्टवेअर हे मानवी हक्काचं उल्लंघन करत आहे हे कारण दाखवत ब्लॅकलिस्ट केलं. ब्लॅकलिस्टचा अर्थ इतका कडक की ह्यापुढे एनएसओला ना डेल कंपनी त्यांचे बलाढ्य कम्युटर्स देऊ शकेल ना अमॅझॉनचे क्लाउड सर्व्हर्स वापरता येतील. इस्रायलचा जीव कंठाशी आला. त्यांनी अमेरिकेला भीती दाखवायला सुरु केली की जर तुम्ही आम्हाला रोखलंत तर एक ना एक दिवस चीन आणि रशिया असं एखाद सॉफ्टवेअर डेव्हलप करेल. मग काय कराल तुम्ही?
अर्थात अमेरिका सध्या ह्या असल्या गोष्टींना बळी पडायला तयार नाही. कारण बोल्डेन्ड नावाच्या अमेरिकन कंपनीने व्हाट्स अपचं एन्क्रिप्टेड कम्युनिकेशन हॅक करण्याचं तंत्र विकसित केलं आहे आणि हे तंत्रज्ञान हाती घेऊन अमेरिकेला इस्रायलसारखीच स्वतःच्या देशातील शस्त्रास्त्र विकायची आहेत. जगभरातील अमेरिकन एम्बसी ह्या तशाही त्या त्या देशांत अमेरिकन भूमीवर तयार होणारी शस्त्रास्त्र विकत असतात आता जर हेरगिरीचं एखादं कमाल सॉफ्टवेअर हाती आलं तर कोणाला नको आहे. बरं बोल्डेन्डने व्हाट्स अप हॅक करायचा प्रयत्न केला आहे अशी तक्रार फेसबुकने अमेरिकन सरकारला केली आहे. पण ह्यातील गमतीचा भाग म्हणजे ह्या दोन्ही कंपन्यांमधला मोठा गुंतवणूकदार आहे पीटर थिल. म्हणजे तक्रार करणारी कंपनी आणि ज्यांच्या विरोधात तक्रार आहे त्यांच्यातला गुंतवणूकदार एकच. थोडक्यात काय हेरगिरीच्या जगातील ही सोन्याची खाण हाती आल्यावर कसले मानवी हक्क, कसली तक्रार आणि कसली नीतिमत्ता.
बरं ज्या अमेरिकेने एनएसओचं पेगासस सॉफ्टवेअर जगभर विकलं त्या कंपनीबरोबर अमेरिकेने करार केला होता की हे सॉफ्टवेअर कधीही अमेरिकन नागरिकाच्या विरोधात वापरलं जाणार नाही. पण तरीही ह्या कराराच उल्लंघन होऊन वॉशिंग्टनमधला एक नंबर सर्व्हिलियन्सवर होता हे उघड झालं. थोडक्यात हा बाटलीच्या बाहेर पडलेला राक्षस आहे, तो कोणाचाच नाही. जगातील महासत्ता त्यांच्या त्यांच्या सोयीने ह्याला वापरणार.
एका सॉफ्टवेअरने दहा वर्षात जगाचा भू-राजकीय आणि अर्थात डिप्लोमॅटिक नकाशा बदलायला सुरु केली आहे. तुम्ही मी काही करू शकतो? खरं तर काहीच नाही... पण हे नक्की काय सुरु आहे हे समजून भाबडेपणा तर बाजूला नक्कीच ठेवू शकतो ना?
ketanalytics चे पॉडकास्ट ऐकायचे असतील किंवा ब्लॉग्स वाचायचे असतील तर नक्की सबस्क्राईब बटण दाबा.

पॉडकास्टची लिंक
https://www.youtube.com/watch?v=f3_m-kUoUFs
Image Courtesy :- The Quint
Insightful indeed and interesting read.
ReplyDelete