अतिरेक श्रम प्रतिष्ठेचा

काही वर्षांपूर्वी दिल्लीतल्या हिमाचल भवन मध्ये अनेकदा रहायचो. एकदा इथला मुक्काम जरा दीर्घ होता. सुट्टीच्या दिवस होता. ज्यांच्यासोबत काम करत होतो त्यांचा फोन आला की माझा एक मित्र तुला भेटायला येईल. भेटून घे त्याला. दुपारी १२ वाजता त्या मित्राचा फोन आला की मी आलोय, खाली ये. मी म्हणलं तुम्ही वर या इथे एक चहा पिऊ. तर त्याने स्पष्ट नकार दिला. मी खाली गेलो. चाळीशीच्या आसपासचा एक मुलगा समोर आला. धारदार नाक, त्याहून धारदार नजर, अंगकाठी शिडशिडीत. त्याने स्वतःची ओळख करून दिली. आणि म्हणाला की हे सरकारी गेस्ट हाऊस आहे इथे कसली कसली लोकं येत असतील, राजकारणात बरबटलेली, असल्या जागेत जाणं मी टाळतो म्हणून मी वर नाही आलो. ह्या मुद्द्यावर तो १० मिनिटं बोलला. मग मला विचारलं, खाना तो खाओगे ना मित्र? मी म्हणलं हो. तर समोर एका ढाब्यासारख्या दिसणाऱ्या खोपटात घेऊन गेला. म्हणाला मी अशा जागा शक्यतो निवडतो कारण इथे येणारी माणसं ही कष्ट करून अन्न कमवतात, आणि त्याहून महत्वाचं अन्न वाढणारा चांगल्या मनाचा असतो. हे असले निष्कर्ष त्याने कुठून काढले माहित नाही. पण एक कळलं होतं ...