'नॉस्टॅलजिया' हा शब्द ऐकला की छे ते दिवस, छे त्या आठवणी, असं म्हणत तो बंद झालेला कप्पा असं सर्वसाधारणपणे मानण्याचा कल आहे. जुन्या आठवणी, जे हरवलं आहे ते पुन्हा मिळणार नाही ह्याची खात्री बाळगत, आता कशाला पुन्हा दुःखाला ऊत आणा ही एकूणच धारणा. पण'नॉस्टॅलजिया'ची पण एक ताकद असते, ती तुम्हाला पुन्हा तरुण करू शकते, एकत्र जोडू शकते हे मी नुकतंच अनुभवलं. 'गतवैभवात रमू नका' असं म्हणणाऱ्या मला पण माझ्या धारणा किती चुकीच्या आहेत ह्याची जाणीव करून दिली. शिवेंद्रसिंह डुंगरपूर नावाचे एक गृहस्थ, सिनेमाची उत्तम समज असलेले, स्वतः काही सिनेमे, जाहिरातींचं, डॉक्युमेंट्रीजचं दिग्दर्शन केलेली व्यक्ती. गेली अनेक वर्ष विस्मरणात ढकललेल्या किंवा निर्मात्यांकडून गहाळ झालेल्या किंवा त्यांची नीट देखभाल न झालेल्या सिनेमांची रीळ घेऊन येतात, त्यावर काम करून त्यांचं डिजिटायझेशन करतात, ह्यासाठी देशाच्याच नाही तर अगदी दक्षिण आशियातील कुठल्याही कोपऱ्यात त्यांना अशी रीळ आहेत असं कळलं तर त्यांची टीम तिकडे पोहचते, ती रीळ ताब्यात घेऊन ती जितकी वाचवता येतील, पुन्हा प्रेक्षकांपर्यंत नेण्याच्या लायकी...
Posts
Showing posts from December, 2022