Posts

Showing posts from May, 2024

सोशल मीडिया ज्याच्या हाती

Image
  हार्वर्ड विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांच्या वसतिगृहातलय १९ वर्षाच्या मार्क झुकरबर्गने विद्यापीठाकडे असलेले विद्यार्थ्यांचे फोटो, त्यांची माहिती, इंट्रानेटवरून चोरली आणि फेसमॅश नावाची पहिली वेबसाईट सुरु केली. या वेबसाईटवर बाकीच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या मते सगळ्यात आकर्षक आणि मादक व्यक्ती कोण याबद्दल मतं नोंदवायची सोय होती. अर्थातच हार्वर्ड विद्यापीठाच्या प्रांगणात यावर वादळ उठलं, पण याच वादळातून ४ फेब्रुवारी २००४ ला 'फेसबुक' चा जन्म झाला. आणि पुढे बरोबर ६ महिन्यात, म्हणजे ऑगस्ट २००४ ला पीटर थिल या जगविख्यात गुंतवणूकदाराने ५ लाख डॉलर्सची गुंतवणूक करत, फेसबुकमध्ये १०.२% भागीदारी घेतली.   याचा अर्थ असा की फेसबुक हे पोराटोरांच्या टाईमपासच साधन नाही, यांत काहीतरी क्रांती घडवण्याची ताकद आहे याची जाणीव पीटर थिलसारख्या चाणाक्ष गुंतवणूकदाराला होती. २०१२ साली जेंव्हा फेसबुकचा आयपीओ आला तेंव्हा पिटर थिलनी स्वतःची भागीदारी विकून १०० करोड अमेरिकन डॉलर्स कमावले. या आयपीओने पीटर थिल आणि इतर काही मूठभर गुंतवणूकदारांच्या संपतीती काही करोड डॉलर्सची वाढ केली असली तरी, त्या आधीच फेसबुक, ट्विटर...