Posts

Showing posts from January, 2025

Health Education and AI

Image
  आर्टिफिशिअल   इंटेलिजन्सबद्दल   किं वा   कृत्रिम   बुद्धिमत्तेबद्दल   एक   छान   वाक्य   वाचनात   आलं .  ते वाक्य   असं   होतं   की  "By far, the greatest danger of Artificial Intelligence is that people conclude too early they understand it ".  थोडक्यात   आर्टिफिशियल  इंटेलि जन्स   म्हणजे   काय   हे   न   समजता त्याच्याबद्दलचा   बागुलबुवा   निर्माण   क रणं   सुरु   आहे .  आर्टिफिशियल   इंटे लिजन्स   म्हणजे   काय ,  हे   समजून   घे ताना  ' इंटेलिजन्स '  किंवा   बुद्धि मत्ता   म्हणजे   काय   हे   पहिलं   समजू न   घ्यावं   लागेल .  शिकत   राहणं ,  प्रत्येकगोष्टीच्या   मागे   कार्यकारणभाव   शोधत   रा हणं ,  त्यातून   एखाद्या   समस्यवेर   मात   कशी   करायची   हे   शिकणं ,  भाषा   शिकू...

ट्रम्प आणि देशीवाद

Image
 ट्रम्प आणि देशीवाद   जानेवारी २०२५ ला अमेरिकन वेळेनुसार सकाळी ८.३९ मिनिटांनी लास वेगास येथील ट्रम्प इंटरनॅशनल हॉटेलच्या बाहेर, टेस्ला सायबरट्र्कमध्ये स्फोट झाला. या स्फोटात मॅथ्यू लिव्हल्सबर्गर या सायबरट्रकच्या चालकाने स्फोटाच्या आधी काही क्षण स्वतःला गोळी मारून घेतली आणि काही क्षणांतच ट्रकचा स्फोट झाला. यातील मृत आरोपी  मॅथ्यू लिव्हल्सबर्गर जो एकेकाळी अमेरिकन सैन्यात होता, आणि जो अफगाणिस्तान युद्धात सैनिक म्हणून गेला होता, त्यांनी त्याच्या मोबाईलमध्ये एक संदेश लिहून ठेवला होता, त्यात तो म्हणतो, 'अमेरिकेने जागं व्हायला हवं, आपण जगभरात ज्या हत्या केल्यात आणि अमेरिकेची जी आज अवस्था झाली आहे, त्याकडे आता आपण गांभीर्याने बघायला हवं. मला ट्रम्प आणि मस्क यांच्याकडून खूप अपेक्षा आहेत.' इत्यादी... मॅथ्यूने हा स्फोट घडवताना जी दोन प्रतीकं वापरली ती म्हणजे 'टेस्ला' चा सायबर ट्र्क आणि 'ट्रम्प' यांचं हॉटेल. आणि अशावेळेला जेंव्हा डोनाल्ड ट्रम्प, एलॉन मस्क हे, डोनाल्ड ट्रम्प यांच्या फ्लोरिडा येथील 'मार-अ-लॅगो' या सप्ततारांकित किंवा त्याहून अधिक तारांकित रिझॉर्टमध्ये...