शिकत राहणं, प्रत्येकगोष्टीच्या मागे कार्यकारणभाव शोधत राहणं, त्यातून एखाद्या समस्यवेर मात कशी करायची हे शिकणं, भाषा शिकून घेणं, आसपासचा भवताल समजून घेणं आणि या सगळ्यातून काही ना काही निर्णय घेणं, याला बुद्धिमत्ता किंवा इंटेलिजन्स म्हणतात. अगदी नेमक्या सगळ्या याच गोष्टी कम्युटर्स सायन्स आणितंत्रज्ञान यांच्या संगमातून घडवून आणणं म्हणजे कृत्रिमबुद्धिमत्ता किंवा आर्टिफिशियल इंटेलिजन्स.
आता एखादी यंत्रणा ही कृत्रिम बुद्धिमत्तेवर चालते म्हणजे काय? तर माणसाची जशी एखाद्या गोष्टीची बोध करून घेण्याची प्रक्रिया असते तशीच्यातशी प्रक्रियाकृत्रिम बुद्धिमत्तेच्या मदतीने तयार झालेल्या एखाद्या यंत्रणेने करणे म्हणजे ती व्यवस्था कृत्रिम बुद्धिमत्तेवर चालते. कृत्रिम बुद्धिमत्तेव रचालणारी कुठलीही सिस्टम ही अल्गोरिदम, डेटा प्रोसेसिंग आणि कम्प्युटेशन या तीन पातळ्यांवर चालते.
आपण 'अल्गोरिदम' हा शब्द इतक्या वेळा ऐकलेला असतो पण त्याचा अर्थ सहजासहजी आपल्याला माहित नसतो.
'अल्गोरिदम' म्हणजे एखादी गोष्ट पूर्ण व्हावी किंवा एखादा प्रॉब्लेम सोडवण्यासाठी अगदीप्रत्येक छोटी कृती काय असावी याला म्हणतात अल्गोरिदम. एक उदाहरण घेऊया... समजा आपल्याला डिक्शनरीमध्ये एखादा शब्द शोधायचा आहे, तरत्यामागच्या कृती काय असतील.डिक्शनरी उघडा, तुम्हाला जो शब्द शोधायचा आहे, त्या शब्दाचा पहिलं अक्षर घ्या आणि त्या अक्षराच्या पानांवर जा आणि तो शब्द तिकडे शोधा. थोडक्यात काय एकदा कृत्रिम बुद्धिमत्तेच्या सिस्टमला ही गोष्ट शिकवली की तो ही गोष्ट खूप जलदगतीने आणि न कंटाळता करत राहतो.
आता जाऊया कम्युटेशनकडे समजा आपण एखादा फोटो कृत्रिमबुद्धिमत्तेला दाखवला, समजा एखाद्या कुत्र्याचा फोटो दाखवला, तर कृत्रिम बुद्धिमत्ता त्या फोटोचे शब्दशः हजारो बारीक तुकडे करतो ज्याला आपण पिक्सल असं म्हणतो. माझ्याकडे अमुक पिक्सलचा कॅमेरा आहे असं म्हणतो तो हाच पिक्सल. मग त्याला जो अल्गोरिदम दिला असेल म्हणजे सूचना दिल्या असतील की त्या फोटोत काय काय बघायचं, तो त्याप्रमाणे बघायला सुरुवात करतो की याला कान आहेत का, डोळे आहेत का, याच्या अंगावर केस आहेत का ? मग मी आत्तापर्यंत कुत्र्यांचे जे फोटोज पाहिलेत त्याच्या जवळ जाणारा हा फोटो आहे का ? अशा अनेक सूचनांमधून कृत्रिम बुद्धिमत्ताता निष्कर्षाला येते की हा कुत्रा आहे.
आता यात अजून एक भाग येतो तो म्हणजे 'डेटा प्रोसेसिंग'...म्हणजे समजा एखाद्या कृत्रिम बुद्धिमत्तेच्या यंत्रणेला (सिस्टमला) जर फक्त जगातील वेगवेगळे प्राणीच ओळखायचे असतील तर त्या यंत्रणेत जगातील सगळ्या प्राण्यांचे फोटो आणि त्याच्याकडे कसं बघायचं (म्हणजे त्या फोटोतील प्राण्याला ओळखण्याचा अल्गोरिदम) शिकवलं की, त्याला कुठलाही फोटो दाखवा तो त्याच्या कृत्रिम बुद्धिमत्तेच्या मेंदूतून काही क्षणांत प्रक्रिया करून म्हणजे त्याला दिलेल्या सगळ्या प्राण्यांचे फोटोज आणि त्याची माहिती यातून तो अचूक प्राणी सांगू शकेल.
हे जर सगळं जरी अद्भुत वाटत असलं तरी हे घडवलंय मानवानेच आणि विश्वास ठेवा की हे सगळं घडेल मानवाच्या फायद्यासाठीच. लेखाच्या सुरुवातीला हे सगळं थोडं विस्ताराने सांगायचं कारण इतकंच की
कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे नेमकं काय हेच अनेकदा माहित नसतं, आणि तरीही अल्पज्ञानातून मनात भयगंड निर्माण होत असतं. आजच्या लेखाचा विषय हा कृत्रिम बुद्धिमत्तेचा शिक्षण आणि आरोग्य यात काय घडतंय आणि काय घडेल असा जरी असला तरी किमान तरुण मुलामुलींनी यापुढे एखाद्या गोष्टीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर केला गेला आहे असं जर आढळलं तर हे नक्की कसं घडलं असेल आणि कृत्रिम बुद्धिमत्ता वापरावी असं का वाटलं असेल याचा सातत्याने विचार करत रहायला जरी चालना मिळाली तरी या लेखाचा उद्देश साध्य झाला म्हणता येईल.
तर शिक्षण आणि आरोग्य ही कुठल्याही समाजासाठी अत्यंत महत्वाचे विषय. एक सहज म्हणून आठवा की शाळेत असताना एखादा विषय हातुमच्यासाठी नावडता विषय असेल, समजा गणित हा विषय नावडता असेल. पण शाळेत विषय आहे म्हणल्यावर शिकण्याशिवाय पर्याय नाही. मग काय वर्गात गणित शिकवताना जरशिक्षकांना ते सोपं करून सांगण्याची कला नसेल तर तो विषय अधिकच अवघड वाटायचा. मग आपल्या घरचे एखादा क्लास लावायचे त्यात पण जर नाही कळलं तर आपण गणितापुढे हात टेकायचो. आता कृत्रिम बुद्धिमत्तेच्या काळात समजा गणित न आवडणारे किंवा न जमणाऱ्या मुलांशी बोलून त्यांना गणित आवडत नाही किंवा समजत नाही म्हणजे काय होतं याची फोड केली जाते, मग त्यांना तेच गणित चित्र रूपाने, एखाद्या गेमच्या रूपाने किंवा एखाद्या ऍनिमेशनच्या पद्धतीने शिकवलं जाईल. बरं हे करताना कृत्रिम बुद्धीमत्तेकडे एकूणच गणित न आवडणाऱ्या विध्यार्थ्यांच्या मानसिकतेचा पण डेटा असल्यामुळे कुठल्या विध्यार्थ्यांना काय पद्धतीने शिकवलं तर त्याला पटकन समजेल याचा तपशील पण तयार असतो. आणि हे सगळं कल्पनारंजन नाहीये तर हे वास्तवात आलं आहे.
शालेय किंवा कुठल्याही अभ्यासक्रमाचं एक अप्लिकेशन तयार करून ते विद्यार्थ्याना मोबाईलवर द्यायला सुरुवात झाली आहे. यात या अप्लिकेशनच्या माध्यमातून २४ तास शिक्षण शक्य आहे आणि
विद्यार्थ्याला तो विषय समजेपर्यंत त्याला तो विषय शिकवला जाईल. आता काही चॅटबॉट्स पण तयार केले गेलेत, ज्यात विद्यार्थ्यांना एखादा प्रश्न सुटत नसेल तर त्यांनी तो प्रश्न चॅटवर पाठवला तर त्याचं
उत्तर त्याला समोर येईल. थोडक्यात शिक्षकांशी जसा विद्यार्थ्यांचा संवाद असतो तसा संवाद सुरु राहतो.
भारतासारख्या देशांत दिव्यांग विद्यार्थ्यांचं शिक्षण हा खूपच मोठा चिंतेचा विषय आहे, पण स्पीच टू टेक्स्ट म्हणजे बोलल्यानंतर तशी अक्षरं उमटणे किंवा टेक्स्ट टू स्पीचद्वारे म्हणजे जी अक्षरं आहेत त्याचा नाद म्हणजे ती ऐकू येणं हे कृत्रिम बुद्धिमत्तेने गाठलेला मोठा टप्पा आहे. आज इंग्रजी किंवा जगातील महत्वाच्या भाषांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता या बाबतीत पारंगत झाली आहे, पण येत्या काही वर्षांत भारतातील भाषा किंवा जगातील छोट्या भाषांमध्ये देखील ही पारंगतता येईल हे नक्की.
आज भारतासारख्या देशांत विद्यार्थी आणि शिक्षकांचं प्रमाण अतिशय व्यस्त आहे. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्यांशी शिक्षकांचा संवाद जवळपास अशक्य आहे. त्यामुळे विद्यार्थ्याला एखादा विषय कळला आहे का नाही हे न पाहताच त्याला पुढचा भाग शिकवला जातो. पुढचं पाठ आणि मागचं सपाट हे होण्याचा धोका अधिक असतो. पण कृत्रिम बुद्धिमत्तेच्या सहाय्याने विद्यार्थ्यांच्या नकळत परीक्षा घेऊन तो भाग त्याला समजला आहे का नाही हेदेखील पाहिलं जातं.
आज ऑगमेंटेड रिऍलिटी आणि व्हर्च्युअल रिऍलिटीने इतका पुढचा टप्पा गाठला आहे की वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या समोर व्हर्च्युअल रिऍलिटीने एक आख्ख मानवी शरीरच उपलब्ध होईल आणि त्याला हवा तसा सराव करणं शक्य होत आहे. इतकंच काय उद्या भूगोलात समजा जगातील वाळवंटी प्रदेश शिकवला जात असेल व्हर्च्युअल रिऍलिटीने आख्ख वाळवंटच विद्यार्थ्यांच्या समोर उभं करणं शक्य आहे.
तसंच कृत्रिम बुद्धिमत्तेने आरोग्य क्षेत्रांतदेखील क्रांती करायला सुरुवात केली आहे. अगदी सोपं आणि सहज बघायला मिळणारं उदाहरण म्हणजेआपल्या हातातील स्मार्ट वॉच. ज्यात आपण किती पावलं दिवसाला चाललो, आपल्या हृदयाचे ठोके योग्य पडत आहेत का नाहीयेत, समजा ते पडत नसतील तर आपल्याला त्याची सूचना देणं, आपल्या झोपेची गुणवत्ता कशी आहे इथपासून तुम्ही दीर्घ श्वास किती घेतले इथपर्यंत जे सगळं नोंदवूनठेवलं जातं, सांगितलं जातं ते कृत्रिम बुद्धिमत्तेच्या आधारावरच.
आयबीएमच वॉट्सन हेल्थ किंवा गुगलच डीपमाईंड असिस्ट सारखं कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित सॉफ्टवेअर कॅन्सर, डायबेटीस सारखे आजार अगदी प्राथमिक अवस्थेत असतानाच त्याचं निदान करू शकतात.
कृत्रिम बुद्धिमत्तेतलं रोबोटिक सर्जरी हे तर वरदानच म्हणावं लागेल. अमुक एका पेशीला झालेला संसर्ग बाकीच्या आसपासच्या पेशींना धक्का न लागता, बाधित पेशींवर उपचार हे फक्त रोबोटिक सर्जरी ने शक्य आहे.
आता तर जगात असे प्रयोग सुरु आहेत की त्या त्या देशातील पेशंट्सची सगळी माहिती साठवून ठेवायची. आणि मशीन लर्निंगच्या सहाय्याने अमुक एक व्यक्ती, त्याच्यात अशी लक्षणं दिसली, त्याची अशी
शारीरिक स्थिती होती, त्याला ही ट्रीटमेंट योग्य ठरली आणि ही नाही ठरली. यामुळे डॉक्टर्सना देखील निदान अचूक करणं सोपं होईल.
यातला पुढचा प्रयोग म्हणजे तुमच्या हातावर एक बँड असेल, जो तुमच्या शरीरातले सगळे बदल टिपेल आणि ते एका सर्व्हरवर नोंदवले जातील.आणि तुमच्या शरीरात कुठेही कुठलाही वेगळा बदल दिसायला लागला तर तुमच्या जवळच्या व्यक्तीला आणि तुमच्या डॉक्टरला त्याची माहितीपोहचेल जेणेकरून प्राथमिक उपचार लगेच सुरु होतील.
शिक्षण असू दे की आरोग्य कृत्रिम बुद्धिमत्ता धमाल आणणार आहे हे नक्की. अर्थात यांत जमा होणारा डेटा, त्याची गुप्तता, त्याचा वापर आणि त्यातू निर्माण होणाऱ्या नैतिक समस्या हे आहेतच. पण बदलाच्या प्रत्येक टप्प्यावर हे असे प्रश्न उभे ठाकतात आणि माणूसच त्याची योग्य ती उत्तरं शोधत पुढे जातो.
चाकाचा शोध, विजेचा शोध, आणि पुढे इंटरनेटचा शोध याने मानवी जीवन अंतर्बाह्य बदललं. या तिन्ही बदलांनी एकत्रितपणे जितकं मानवी आयुष्यबदललं त्यापेक्षा मोठा बदल कृत्रिम बुद्धिमत्ता आणणार हे नक्की.
केतन जोशी
Comments
Post a Comment