Posts

Showing posts from February, 2025

मराठी जगाची खिडकी युट्युब व्हावी

Image
  १४ फेब्रुवारी २०२५ ला 'युट्युब'ला २० वर्ष पूर्ण झाली. अवघ्या वीस वर्षात युट्युब २७० करोड लोकांच्या पर्यंत पोहचलं आहे आणि दिवसाला काही दशकरोड तासांचा कन्टेन्ट युट्युबवर बघितला जातो. भारताचंच उदाहरण घ्यायचं झालं तर जवळपास ४६ करोड भारतीय हे कधी ना कधी युट्युब बघतातच आणि त्यातले १२ करोड भारतीय हे न चुकता रोज युट्युब बघतात. भारताचाच युट्युब बघण्याचा सरासरी कालावधी हा ७० मिनिटांच्या आसपास आहे.   भारतातील सर्व टेलिव्हिजन चॅनल्सची व्ह्यूअरशिप आणि यूट्यूबची व्ह्यूअरशिप ही जवळपास सारखीच असली तर आश्चर्य वाटायला नको. अमेरिकेत तर युट्युब हे सगळ्या ब्रॉडकास्टर्सपेक्षा जास्त लोकप्रिय आणि प्रभावी माध्यम ठरलं आहे, ते इतकं की २००७ पासून अमेरिकन राष्ट्राध्यक्षाच्या निवडणुकीच्या वेळेस तिथल्या उमेदवारांच्यात जाहीर चर्चा होते ती चर्चा युट्युबवर दाखवली जात आहे आणि सगळ्यात जास्त व्ह्यूअरशिप ही त्या चॅनेलपेक्षा आणि युट्युब प्रसारणाला मिळत आहे.  भारतात सुद्धा २०१० पासून आयपीएलच्या मॅचेसचं प्रसारण हे युट्युबवर सुरु झालं. आणि त्याला विक्रमी प्रतिसाद मिळाला. यूट्यूबची ताकद किती प्रचंड आहे याचं एक उ...