अड्रियन ब्रोडी आणि ऑस्कर
अ ड्रियन ब्रोडी या अभिनेत्याला या वर्षीचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा ऑस्कर पुरस्कार घोषित झाला. पुरस्कार स्वीकारताना त्यांनी आजपर्यंतचं ऑस्करच्या इतिहासातील सर्वात लांबलचक भाषण केलं, ते म्हणजे ५ मिनिटं २० सेकंदांच. अकॅडमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स आणि सायन्सकडून दिल्या जाणाऱ्या या पुरस्करांच्या सोहळ्यात हे एक बरं असतं की तुम्हाला जरी ऑस्कर मिळाला असला तरी तुम्ही पाल्हाळ लावताय असं दिसलं तर मागे एक संगीत वाजायला लागतं. ही जणू एक जाणीवच असते की, आता पुरे... पण अड्रियन ब्रोडीने त्याच्याकडे पण दुर्लक्ष करत आपलं बोलणं चालूच ठेवलं, तो आभार मानतच राहिला. याचं कारण दीर्घकाळानंतर वयाच्या पन्नाशीला त्याच्या वाट्याला 'द ब्रूटलिस्ट' या सिनेमातला 'लाहस्लो टोट' या प्रमुख पात्राचा रोल. याच्या आधी २००२ ला 'द पियानिस्ट' या सिनेमासाठी त्याला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला होता. त्यावेळेस 'अड्रियन ब्रोडी'चं वय होतं अवघ्या २९ वर्षांचं. अकॅडमी ऑफ मोशन पिक्चर्सच्या इतिहासातील सर्वात कमी वयात 'ऑस्कर' पुरस्कार जिंकलेला अभिनेता. मधल्या २२ वर्षात अड्रियनने अनेक भूमिक...