संवादाचा नवा नियंता

ट्विटरच्या ऑफिसमध्ये असं गमतीत म्हणलं जातं की ट्विटरच्या जगात रोज नवीन कथा जन्माला येत असतात, नवीन नायक जन्माला येत असतात. त्या नायकांना कधी डोक्यावर बसवलं जातं तर कधी पायदळी तुडवलं जातं. कित्येकांचा मानसिक छळ केला जातो पण हे सगळं होत असताना ट्विटरच्या ऑफिसमध्ये बसलेल्या कोणीच त्या स्टोरीचा भाग व्हायचं नाही आणि नायक होण्याचा तर विचार पण करू नये. पण ट्विटरला एक नवीन मालक मिळणार आहे जो ट्विटरने घातलेले अनेक नियम पायदळी तुडवायला निघाला आहे आणि हे करताना स्वतः नायक न होण्याचा नियम तर त्याला कधीच मान्य होणार नाही. एलॉन मस्क, ४४ बिलियन डॉलर्स इतकी अवाढ्यव रक्कम मोजून ट्विटरवर ताबा मिळवायला निघाला आहे. जगातील एक बलाढ्य आणि विश्वासार्ह मानलं जाणारं सोशल मीडिया माध्यम अशा एका व्यक्तीच्या ताब्यात जाणार आहे ज्याला नैतिक, सामाजिक संकेतांच्या चौकटीच मान्य नाहीत. ही स्टोरी गेले काही दिवस भारतीय माध्यमांमध्ये देखील चर्चेत आहे पण ट्विटरचा सीईओ भारतीय असल्यामुळे त्याचं काय होणार आणि ४४ बिलियन डॉलर्सच्या व्यवहाराने विस्फारलेले डोळे ह्या पलीकडे भारतीय माध्यमं जायलाच तयार नाहीत. पाश...