जग भूकबळींच्या उंबरठ्यावर?

जग भूकबळींच्या उंबरठ्यावर? गेले काही दिवस पाश्चिमात्य माध्यमं एक भाकीत वर्तवत आहेत की जग भूकबळींच्या उंबरठ्यावर आहे आणि येत्या काही महिन्यात जगातील अनेक देशांमध्ये अन्नधान्याचा प्रचंड तुटवडा असणार आहे. अर्थात अशा कोणत्याही घटनेला कोणालातरी जबाबदार धरणं हे जगभरातील राज्यकर्त्यांचा काम असतं. तसं ह्या वेळेस व्लादीमीर पुतीन ह्यांना जबाबदार धरलं आहे. अर्थात कारण म्हणजे पुतिननी युक्रेनवर लादलेलं युद्ध. वॉशिंग्टन पोस्टचा अंदाज आहे की जगभरातील २१९ दशलक्ष लोकं ही अन्नधान्याच्या अनिश्चिचिततेच्या छायेत (food insecure) जगत आहेत. थोडक्यात आज जेवण मिळालं उद्याच काय ह्या विवंचनेत जगत आहेत. अगदी आपल्या शेजारचं उदाहरण आहे श्रीलंकेचं. श्रीलंकेत अन्नधान्याचा अभूतपूर्व तुटवडा आहे. आणि अर्थात राजपक्षे राजवट जशी त्याला जबाबदार आहे तसंच पुतीननी युक्रेनवर लादलेलं युद्ध पण. युक्रेन हा जगातील अनेक देशांचा अन्नदाता आहे. श्रीलंका, येमेन, सुदान, लेबेनॉन, युगांडा, टांझानिया, इजिप्त, ट्युनिशिया, कॅमेरॉन सारखे देश शब्दशः युक्रेनमधून आयात होणाऱ्या धान्यावर अवलंबून असणारे देश आहेत. पुतीननी ब्लॅक ...