आपणच नियती ह्या थाटात वावरणाऱ्यांना पराभव पचवता येत नाही, त्यांच्यासाठी 'विन्स्टन चर्चिल' उतारा
पराभव हा पचायला सगळ्यात कठीण पदार्थ. आणि पराभवानंतर देखील स्वतःची ग्रेस, मिश्कीलपणा जो कायम टिकवून ठेऊ शकतो तोच पुन्हा जेता होण्याची शक्यता असते. काल जे काही महाराष्ट्राच्या विधानसभेत घडलं त्यावर एक प्रसंग आठवला आणि ते लिहावंसं वाटलं.
अर्थात आधीच डिस्क्लेमर टाकतो की सातत्याने 'बौद्धिकं आणि चिंतन शिबिरं' भरवणाऱ्या कुठल्याही वर्गाला कोणत्याही प्रकारे भान देण्याचा माझा कोणताही उद्देश नाही, तेवढी क्षमता देखील नाही.
तर....
नेटफ्लिक्सवरच्या 'क्राऊन' ह्या सिरीयल मधल्या पहिल्यासिझनमधल्या एका एपिसोड मधला भाग. क्वीन एलिझाबेथ २ ह्यांचा विवाह सोहळ्याचा दिवस म्हणजेच २० नोव्हेंबर १९४७. तेंव्हाच्या ग्रेट ब्रिटन मध्ये सत्तांतर होऊन दोन वर्ष झाली आहेत. विन्स्टन चर्चिल ज्यांनी दुसरं महायुद्ध मित्र पक्षांना जिंकून दिलं आणि इतकंच नव्हे तर हिटलरच्या पाशवी हल्ल्यांनी गर्भगळीत झालेल्या ब्रिटनला ज्यांनी सावरलं ते दुसऱ्या महायुद्धानंतरच्या सार्वत्रिक निवडणुकात सपशेल पराभूत झाले होते आणि किमान विन्सटन चर्चिल ह्यांच्या तुलनेत फारच सुमार दर्जाचे वाटणारे क्लेमंट अॅटली हे देशाचे पंतप्रधान होते. अर्थातच विन्स्टन चर्चिल ह्यांना पराभव जिव्हारी लागला होता... पण स्वतःची ग्रेस कमी होऊ न देता देखील मिष्कीलपणाने विरुद्ध पक्षावर मात कशी करायची ह्याचा पूर्ण अभ्यास चर्चिला ह्यांचा असावा. तर कालच्या घटनेनंतर आठवलेला प्रसंग ... (ह्यात थोडीफार नाट्यमयता/ फिक्शनल टच क्राऊनच्या लेखकांनी आणला नसेलच असं म्हणणार नाही. )
क्वीन एलिझाबेथ २ ह्यांच्या लग्नसोहळ्याचा दिवस. वेस्टमिन्स्टर ऍबे मध्ये तमाम मान्यवर जमले आहेत. बाहेर ब्रिटिश नागरिक ह्या सोहळ्यासाठी गर्दी करून उभे आहेत. प्रोटोकॉल प्रमाणे शेवटून दुसरे पंतप्रधान येणार आणि पंतप्रधान आले की पुढे काही क्षणातच राजा पंचम जॉर्ज आपल्या मुलीला अर्थात क्वीन एलिझाबेथ २ ह्यांना घेऊन येणार आणि त्यावेळेला राष्ट्रगीताची धून वाजली की आपोआप सगळं सभागृह उभं राहणार. तर पंतप्रधान क्लेमंट अॅटली पोहचलेत, आता अर्थातच राजाचं आगमन बाकी आहे. गेल्या गेल्या अॅटलींच्या लक्षात येतं की चर्चिल ह्यांच्यासाठी असलेली राखीव जागा रिकामी आहे. आणि पंतप्रधान क्लेमंट अॅटली ह्यांच्या लक्षात येतं की अत्यंत मोक्याच्या क्षणी विन्स्टन चर्चिल पंतप्रधान नसून देखील पुन्हा एकदा बाजी मारून जाणार.
तेवढ्यात वेस्टमिन्स्टर ऍबेच्या बाहेर चर्चिल गाडीतून उतरतात, ब्रिटिश नागरिक 'चर्चिल... चर्चिल' असा घोष सुरु करतात. चर्चिलना जे साध्य करायचं असतं ते साध्य झालंय. ते क्षणभर थांबतात, गर्दीकडे कटाक्ष टाकतात आणि तिथे असलेल्या एका लहान मुलाला विचारतात "has everyone arrived?"
तो मुलगा उत्तर देतो, "Yes, Except The King"
त्यावर चर्चिल म्हणतात "ofcoure"
तेवढ्यात राजाची बग्गी वेस्टमिन्स्टर ऍबेच्या अगदी जवळ आली म्हणल्यावर आगमनाची धून वाजू लागते, आणि आख्ख चर्च उभं राहतं आणि जणू काही हे सभागृह आणि बाहेरची मंडळी मी पंतप्रधान नसताना देखील माझ्या स्वागताला उभी आहेत अशा थाटात डोक्यावरची हॅट काढून चर्चिल सगळ्यांचं अभिवादन स्वीकारत पुढे जातात. ह्या सगळ्याचा अॅटली आणि त्यांच्या सहकाऱ्यांना प्रचंड त्रास होतो. त्यांच्यातील एक बोलून दाखवतो, 'shameless winston'... चर्चिलना बहुदा अंदाज असतो कोण काय बोलेल ते त्या माणसाकडे एक गोंडस लूक देऊन ते सरळ खुर्चीवर विराजमान होतात. आणि नेहमीप्रमाणे अॅटली पासून ते लॉर्ड माउंटबॅटन ह्यांच्यावर टिपिकल विन्स्टन चर्चिल पद्धतीची शेरेबाजी सुरु करतात.
प्रसंग छोटा आहे पण पराभवानंतर पण मी चर्चिल आहे, दुसरं महायुद्ध जिंकून देणारा चर्चिल आहे, लोकांनी नाकारलं असलं तरी मी कडवट होता कामा नये उलट अगदी छोट्या छोट्या मिळतील त्या लढायांमधून समोरच्याला खिजवण्याचा मिश्कीलपणा गमवायचा नाही हे त्यांनी घट्ट डोक्यात ठेवलं.
त्यांनी समोरच्याला खिजवलं भरपूर पण हे करताना ग्रेस त्यांनी कधी सोडली नाही. पुन्हा १९५१ च्या सार्वत्रिक निवडणुकीत चर्चिल ब्रिटनचे पंतप्रधान झाले, ती कारकीर्द फारशी यशस्वी नव्हती. इतकी की १९५२ च्या आज जसं दिल्लीवर प्रचंड धुक्याचे काळे ढग आहेत तसे काळेढग ब्रिटनवर सलग ५ दिवस होते आणि ते ढग हे act of god म्हणून चर्चिल दुर्लक्षित करत होते आणि त्याचा कहर इतका की कदाचित क्वीन एलिझाबेथ २ ह्यांनी त्यांना तुमचं नेतृत्वावर का विश्वास ठेवावा असा प्रश्न देखील विचारायचं ठरवलं होतं..
इतकं सगळं होऊन देखील ब्रिटिशांच्या मनावरचं चर्चिल ह्यांचं गारुड अजून हटलेलं नाही कारण त्यांचं कर्तृत्वच तितकं उत्तुंग होतं.
आपणच नियती ह्या थाटात वावरणाऱ्यांना पराभव पचवता येत नाही, असं किमान ह्या राज्यात तरी कुठे होऊ नये ही इच्छा. येणारा प्रत्येक सत्ताधीश, नेता हा काही ना काही देऊन जात असतो आणि तो कधी ना कधी सत्तेतून बाहेर जातो, काहीवेळेस तो पुन्हा येतो किंवा येत नाही. सत्तेत आला तर ठीक, नाही आला तर त्याची ओळख त्याच्या कामांसाठी लक्षात राहावी, त्याच्या कडवटपणासाठी नसावी.
ketanalytics

Comments
Post a Comment