Posts

तर्कबुद्धीचा उतारा

  'अभिव्यक्ती स्वातंत्र्य हा जरी नागरिकांचा मूलभूत अधिकार असला तरी, त्याचं मूल्य आणि महत्व नागरिकांनीच समजून घेतलं पाहिजे. ते जर न समजून घेता उद्या त्याचा अयोग्य वापर सुरु झाला तर सरकार हस्तक्षेप करेल. सरकारचा हस्तक्षेप कोणालाच हवासा वाटत नाही, त्यामुळे लोकांनीच जबाबदारीचं भान स्वतःच स्वतःसाठी आचारसंहिता आखून घ्यावी.'   १४ जुलै २०२५ रोजी सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती के.व्ही. विश्वनाथन आणि न्यायमूर्ती बी.व्ही. नागरत्त्न यांच्या  न्यायमंडळाने  , वजाहत खान विरुद्द केंद्र सरकार या केसचा निकाल देताना हे महत्वपूर्ण भाष्य केलं. विषय होता अर्थातच समाज माध्यमांवर सुरु असलेली बेबंद अभिव्यक्ती.  वजाहत खान यांनी 'शर्मिष्ठा पनोली' या इन्फ्ल्यूअन्सरने समाज माध्यमावर इस्लामचा अपमान करणारी पोस्ट केली म्हणून गुन्हा दाखल केला होता आणि त्यानंतर 'शर्मिष्ठा'ला अटक देखील झाली. पण शर्मिष्ठाच्या अटकेनंतर, वजाहत यांच्या विरोधात त्यांने हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणारी पोस्ट केली म्हणून गुन्हे दाखल झाले. क्रिया-प्रतिक्रिया हा खेळ सुरु झाला. आणि शेवटी वजाहत यांनी स्वतःच्या विरोधात...

अड्रियन ब्रोडी आणि ऑस्कर

 अ ड्रियन ब्रोडी या अभिनेत्याला या वर्षीचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा ऑस्कर पुरस्कार घोषित झाला. पुरस्कार स्वीकारताना त्यांनी आजपर्यंतचं ऑस्करच्या इतिहासातील सर्वात लांबलचक भाषण केलं, ते म्हणजे ५ मिनिटं २० सेकंदांच. अकॅडमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स आणि सायन्सकडून दिल्या जाणाऱ्या या पुरस्करांच्या सोहळ्यात हे एक बरं असतं की तुम्हाला जरी ऑस्कर मिळाला असला तरी तुम्ही पाल्हाळ लावताय असं दिसलं तर मागे एक संगीत वाजायला लागतं. ही जणू एक जाणीवच असते की, आता पुरे... पण अड्रियन ब्रोडीने त्याच्याकडे पण दुर्लक्ष करत आपलं बोलणं चालूच ठेवलं, तो आभार मानतच राहिला. याचं कारण दीर्घकाळानंतर वयाच्या पन्नाशीला त्याच्या वाट्याला 'द ब्रूटलिस्ट' या सिनेमातला 'लाहस्लो टोट' या प्रमुख पात्राचा रोल. याच्या आधी २००२ ला 'द पियानिस्ट' या सिनेमासाठी त्याला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला होता. त्यावेळेस 'अड्रियन ब्रोडी'चं वय होतं अवघ्या २९ वर्षांचं. अकॅडमी ऑफ मोशन पिक्चर्सच्या इतिहासातील सर्वात कमी वयात 'ऑस्कर' पुरस्कार जिंकलेला अभिनेता. मधल्या २२ वर्षात अड्रियनने अनेक भूमिक...

मराठी जगाची खिडकी युट्युब व्हावी

Image
  १४ फेब्रुवारी २०२५ ला 'युट्युब'ला २० वर्ष पूर्ण झाली. अवघ्या वीस वर्षात युट्युब २७० करोड लोकांच्या पर्यंत पोहचलं आहे आणि दिवसाला काही दशकरोड तासांचा कन्टेन्ट युट्युबवर बघितला जातो. भारताचंच उदाहरण घ्यायचं झालं तर जवळपास ४६ करोड भारतीय हे कधी ना कधी युट्युब बघतातच आणि त्यातले १२ करोड भारतीय हे न चुकता रोज युट्युब बघतात. भारताचाच युट्युब बघण्याचा सरासरी कालावधी हा ७० मिनिटांच्या आसपास आहे.   भारतातील सर्व टेलिव्हिजन चॅनल्सची व्ह्यूअरशिप आणि यूट्यूबची व्ह्यूअरशिप ही जवळपास सारखीच असली तर आश्चर्य वाटायला नको. अमेरिकेत तर युट्युब हे सगळ्या ब्रॉडकास्टर्सपेक्षा जास्त लोकप्रिय आणि प्रभावी माध्यम ठरलं आहे, ते इतकं की २००७ पासून अमेरिकन राष्ट्राध्यक्षाच्या निवडणुकीच्या वेळेस तिथल्या उमेदवारांच्यात जाहीर चर्चा होते ती चर्चा युट्युबवर दाखवली जात आहे आणि सगळ्यात जास्त व्ह्यूअरशिप ही त्या चॅनेलपेक्षा आणि युट्युब प्रसारणाला मिळत आहे.  भारतात सुद्धा २०१० पासून आयपीएलच्या मॅचेसचं प्रसारण हे युट्युबवर सुरु झालं. आणि त्याला विक्रमी प्रतिसाद मिळाला. यूट्यूबची ताकद किती प्रचंड आहे याचं एक उ...

Health Education and AI

Image
  आर्टिफिशिअल   इंटेलिजन्सबद्दल   किं वा   कृत्रिम   बुद्धिमत्तेबद्दल   एक   छान   वाक्य   वाचनात   आलं .  ते वाक्य   असं   होतं   की  "By far, the greatest danger of Artificial Intelligence is that people conclude too early they understand it ".  थोडक्यात   आर्टिफिशियल  इंटेलि जन्स   म्हणजे   काय   हे   न   समजता त्याच्याबद्दलचा   बागुलबुवा   निर्माण   क रणं   सुरु   आहे .  आर्टिफिशियल   इंटे लिजन्स   म्हणजे   काय ,  हे   समजून   घे ताना  ' इंटेलिजन्स '  किंवा   बुद्धि मत्ता   म्हणजे   काय   हे   पहिलं   समजू न   घ्यावं   लागेल .  शिकत   राहणं ,  प्रत्येकगोष्टीच्या   मागे   कार्यकारणभाव   शोधत   रा हणं ,  त्यातून   एखाद्या   समस्यवेर   मात   कशी   करायची   हे   शिकणं ,  भाषा   शिकू...