२०२२ :- महागाईचा भडका- हायब्रीड वर्क कल्चर- पर्यावरणपूरक ऑफिसेसचा रेटा आणि बरंच काही
Image Courtesy :- The Economist जानेवारी महिन्याच्या सुरुवातीला 'द इकॉनॉमिस्ट' ची २०२२ बद्दलचे आडाखे काय आहेत ह्याबद्दल ब्लॉग लिहून एकूणच आंतरराष्ट्रीय विषयांवरती ब्लॉग्स लिहूया असं ठरवलं. मग एक एक खंड कव्हर करत आलो आणि ह्या मालिकेतला आजचा भाग आहे व्यापार, अर्थकारण आणि विज्ञानाच्या जगात काय घडेल ह्याविषयीचे त्यांचे अंदाज. २०२१ च्या सुरुवातीला म्हणजेच जानेवारी २०२१ मध्ये भारतात व्हॅक्सिनेशन सुरु झालं. अर्थात सुरुवातीला ते फ्रंटलाईन वर्कर्ससाठी होतं मग पुढे ते सिनियर सिटिझन्स, मग ४५ च्या पुढच्यांना करत अगदी आता १५ वर्ष वयाच्या पुढच्यांपर्यंत वॅक्सीन उपलब्ध झालं. पण ह्या प्रवासात दुसरी लाट येईपर्यंत व्हॅक्सिनची मागणी कमी होती आणि पुढे ती प्रचंड वाढली. लोकं ८, ८ तास ताटकळत उभे होते आणि व्हॅक्सिन नाही म्हणून प्रचंड संतापले होते. ह्याचा ताण इतका वाढला की सिरम इन्स्टिट्यूटचे अदर पुनावाला आपल्या कुटुंबासह लंडनला निघून गेले. आणि त्याच वर्षीच्या म्हणजे २०२१ च्या डिसेंबरमध्ये सिरमने डिक्लेअर केलं की त्यांच्याकडे व्हॅक्सिनची मागणी पुरेशी नसल्यामुळे त्यांनी प्रॉडक्शन निम्म्यावर आणल...