Posts

'नागोर्नो-काराबाख' दीर्घकाळ किंवा कायम चालू राहील असं अजून एक युद्ध

Image
 दोन देशांच्या निर्मितीनंतर किंवा निर्मितीच्या आसपास, दोन देशांमध्ये शत्रुत्व निर्माण होणं आणि त्या भागावर नक्की कोणाचा हक्क आहे यावरून रक्तरंजित लढाया होणं,  ही मागच्या शतकाची जगाला देण आहे. वसाहतवादाच्या काळात युरोपातील विविध सत्तांनी राजवटी निर्माण केल्या, आणि  पूर्ण भिन्न असलेल्या प्रदेश किंवा त्यातील समूहांमध्ये एकजिनसीपणा आणण्याचा प्रयत्न केला. हा प्रयत्न यशस्वी झाला असं वसाहतवाद्यांना वाटणं हे स्वाभाविक होतं, कारण जगाचं भलं करण्याची जबाबदारी आपल्या शिरावर आहे, असं वाटून घेऊन त्यांनी सर्व गोष्टी घडवल्या होत्या. अर्थात इंग्रजीत ज्याला व्हाईट मॅन'स बर्डन असं म्हणलं जातं, तो भार हा फक्त देखावा होता, कारण मूळ उद्देश व्यापारातून अफाट नफा कमावणे आणि तो कमावताना वाट्टेल तशी पिळवणूक करणे, हे ओघाने आलंच.    मग मागच्या शतकात दोन महायुद्ध झाली, या दोन महायुद्धानी वसाहतवादी जग संपवलं, एक एक देश, प्रांत स्वतंत्र होऊ लागले. आणि स्वातंत्र्याची झुळूक आली आणि त्याने सुद्धा अस्मिता, हितसंबंध, पारंपरिक द्वेष आणि अर्थात भीती डोकं वर काढायला लागली आणि भूभागाच्या मालकी हक्कांवर...

सोशल मीडिया ज्याच्या हाती

Image
  हार्वर्ड विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांच्या वसतिगृहातलय १९ वर्षाच्या मार्क झुकरबर्गने विद्यापीठाकडे असलेले विद्यार्थ्यांचे फोटो, त्यांची माहिती, इंट्रानेटवरून चोरली आणि फेसमॅश नावाची पहिली वेबसाईट सुरु केली. या वेबसाईटवर बाकीच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या मते सगळ्यात आकर्षक आणि मादक व्यक्ती कोण याबद्दल मतं नोंदवायची सोय होती. अर्थातच हार्वर्ड विद्यापीठाच्या प्रांगणात यावर वादळ उठलं, पण याच वादळातून ४ फेब्रुवारी २००४ ला 'फेसबुक' चा जन्म झाला. आणि पुढे बरोबर ६ महिन्यात, म्हणजे ऑगस्ट २००४ ला पीटर थिल या जगविख्यात गुंतवणूकदाराने ५ लाख डॉलर्सची गुंतवणूक करत, फेसबुकमध्ये १०.२% भागीदारी घेतली.   याचा अर्थ असा की फेसबुक हे पोराटोरांच्या टाईमपासच साधन नाही, यांत काहीतरी क्रांती घडवण्याची ताकद आहे याची जाणीव पीटर थिलसारख्या चाणाक्ष गुंतवणूकदाराला होती. २०१२ साली जेंव्हा फेसबुकचा आयपीओ आला तेंव्हा पिटर थिलनी स्वतःची भागीदारी विकून १०० करोड अमेरिकन डॉलर्स कमावले. या आयपीओने पीटर थिल आणि इतर काही मूठभर गुंतवणूकदारांच्या संपतीती काही करोड डॉलर्सची वाढ केली असली तरी, त्या आधीच फेसबुक, ट्विटर...

युरोपातील 'लिटिल चायना'

Image
  नोव्हेंबर २०२३ च्या पहिल्या आठवड्यात, ऑस्ट्रियातल्या हेलस्टॅट ह्या एका छोट्याशा खेडेगाववजा शहरांत एक दिवसाच्या प्रवासाला गेलो होतो. बस सकाळी ७:१५ वाजता व्हिएन्नातल्या स्टेट ऑपेरा सेंटरपासून सुटणार होती. बस जरी ७:१५ ला सुटणार असली तरी तुम्ही ७ ला येणं अपेक्षित आहे असा इमेल आधी दोन दिवस रोज येत होता. आणि तुम्ही जर ७ वाजता नाही पोहोचलात तर बसच्या चालकापासून ते टूरच्या गाईडच्या नापसंतीच्या कटाक्षाची तयारी ठेवायची. तर बसपाशी ७ वाजता पोहचलो, आत शिरलो. आणि थोडासा धक्काच बसला कारण बसध्ये पहिल्या ३ रांगा सोडल्या तर पूर्ण बस ही चिनी प्रवाशांनी भरलेली होती. व्हिएन्नातला प्रवास सुरु व्हायच्या आधी नेदरलँड्सच्या शिपोल एअरपोर्टपासूनच चिनी माणसांचे जथ्थेच्या जथ्थे बघायची सवय लागली होती. पण हे दृश्य जरा अतीच वाटलं.   प्रवासात एका ठिकाणी बस खाण्यापिण्यासाठी थांबली होती. त्या रेस्टोरंटमध्ये चिनी लोकं कामाला. काही पदार्थांची नावं जर्मन आणि मँडरिनमध्ये दिली होती. इथे मात्र जाणवायला लागलं की चिनी लोकांनी फक्त चंचुप्रवेश नाही तर इथे चांगलाच जम बसवला आहे. जसं हेलस्टॅट जवळ यायला लागलं तसं आमच्या गाई...

मराठी पाऊल का अडखळते ?

Image
  'मराठी माणसाच्या महत्वकांक्षा बोथट झाल्या आहेत का?', 'बरं चाललं आहे की, कितीही मिळालं तरी कमीच असतं' ह्या विचारपद्धतीत मराठी माणूस अडकला आहे का ?,   'उत्तुंग काही तरी करावं, घडवावं अशी एकूणच मराठी समूह मनाची इच्छाच संपली आहे का?'  लेखाच्या सुरुवातीलाच तीन प्रश्न जे काहीसे अप्रिय, आणि राग आणणारे वाटतील पण एकूणच चित्र बघितलं तर हे मान्य करायला कितीही जड गेलं ,तरी हे वास्तव आहे. काहीतरी मिळवण्याच्या किंवा घडवण्याच्या महत्वकांक्षेच्या स्पर्धेत एकूणच मराठी समाज मागे पडत चालला आहे.  ह्यात आत्ता अगदी सुरुवातीलाच सांगतो की जे जे मुद्दे मी उपस्थित करणार आहे, त्यात सन्माननीय अपवाद आहेत आणि त्या माणसांविषयीचं कौतुक आणि कृतज्ञता हे दोन्ही आहे. पण म्हणून प्रत्येक क्षेत्रांत हाताच्या बोटावर मोजण्याइतके लोकं हेच जर आपलं यश मानत असू तर मात्र मराठी समूहमनाला आत्मपरीक्षणाची गरज आहे.  ह्यात मराठी म्हणजे कोण, इथे पिढ्यानपिढ्या राहिलेले, वालचंद परिवार, फिरोदिया, बजाज ह्यांना आपण मराठी मानून आणि ते कसे उत्तम मराठी बोलतात इत्यादी बाबींवर समाधान मानून त्यांना आपलं म्हणा, ह्या खटपटीत ...

उजव्या लाटेचा सांगावा

Image
  एक २५ वर्षांपूर्वी ऑस्ट्रियाच्या 'फ्रीडम पार्टी ऑफ ऑस्ट्रिया'ने जेंव्हा १९९९ च्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये २७% मतं मिळवली आणि ते पुढे तिथल्या सरकारचा भाग बनले तेंव्हा संपूर्ण युरोपातच नाही तर पार अमेरिकन राजनय (डिप्लोमॅटिक) जगात हाहाकार माजला होता. व्हिएन्नाशी राजकीय संबंध तोडून त्यांच्यावर काही निर्बंध पण लादले होते. अगदी आत्तापर्यंत, म्हणजे एक १० वर्षांपूर्वी पर्यंत ऑस्ट्रियन नागरिक मी 'फ्रीडम पार्टी ऑफ ऑस्ट्रिया' चा मतदार आहे हे सांगताना काहीसा कचरायचा. पण ह्या पक्षाचं ध्येय धोरण हे आता ऑस्ट्रियन राजकारणात अगदीच रुळायला लागलं आहे. 'फ्रीडम पार्टी ऑफ ऑस्ट्रिया' चा सरळसरळ झुकाव हा हिटलरच्या नाझी विचारसरणीशी आहे आणि ह्या पक्षाचे पूर्वीचे नेते हे तर हिटलरच्या 'एसएस' ह्या निमलष्करी दलातील अधिकारी होते.   फ्रान्समध्ये 'नॅशनल रॅली' (आधीचा 'नॅशनल फ्रंट') ह्या पक्षाच्या जिन-मेरी -ल-पेन ह्यांच्यासोबत तेंव्हाचे फ्रान्सचे अध्यक्ष म्हणून निवडून आलेल्या जॅक शीरॅक ह्यांनी तर, निवडणुकीच्या आधीच्या चर्चांमध्ये 'नॅशनल फ्रंट' सारख्या अतिउजव्या ...