ट्रम्प आणि देशीवाद

ट्रम्प आणि देशीवाद जानेवारी २०२५ ला अमेरिकन वेळेनुसार सकाळी ८.३९ मिनिटांनी लास वेगास येथील ट्रम्प इंटरनॅशनल हॉटेलच्या बाहेर, टेस्ला सायबरट्र्कमध्ये स्फोट झाला. या स्फोटात मॅथ्यू लिव्हल्सबर्गर या सायबरट्रकच्या चालकाने स्फोटाच्या आधी काही क्षण स्वतःला गोळी मारून घेतली आणि काही क्षणांतच ट्रकचा स्फोट झाला. यातील मृत आरोपी मॅथ्यू लिव्हल्सबर्गर जो एकेकाळी अमेरिकन सैन्यात होता, आणि जो अफगाणिस्तान युद्धात सैनिक म्हणून गेला होता, त्यांनी त्याच्या मोबाईलमध्ये एक संदेश लिहून ठेवला होता, त्यात तो म्हणतो, 'अमेरिकेने जागं व्हायला हवं, आपण जगभरात ज्या हत्या केल्यात आणि अमेरिकेची जी आज अवस्था झाली आहे, त्याकडे आता आपण गांभीर्याने बघायला हवं. मला ट्रम्प आणि मस्क यांच्याकडून खूप अपेक्षा आहेत.' इत्यादी... मॅथ्यूने हा स्फोट घडवताना जी दोन प्रतीकं वापरली ती म्हणजे 'टेस्ला' चा सायबर ट्र्क आणि 'ट्रम्प' यांचं हॉटेल. आणि अशावेळेला जेंव्हा डोनाल्ड ट्रम्प, एलॉन मस्क हे, डोनाल्ड ट्रम्प यांच्या फ्लोरिडा येथील 'मार-अ-लॅगो' या सप्ततारांकित किंवा त्याहून अधिक तारांकित रिझॉर्टमध्ये...