Posts

‘आदित्यपर्वात’ तरी शिवसेनेची ‘फ्रेंडलिस्ट’ वाढणार का?

Image
(हा लेख 'महापंच' ह्या वेबपोर्टलसाठी लिहिला आहे ) शिवसेनेची स्थापना १९६६ची. तेव्हापासून आजपर्यंत ह्या संघटनेची बांधणी आणि मिळवलेलं यश हे जितकं विस्मयकारक आहे तितकंच अनेकदा पराभव होऊन, प्रचंड टीका होऊन देखील शिवसेना हा पक्ष देशातील इतर राजकीय पक्षांसारखा एखाद्या निवडणुकीत एकदम रसातळाला गेलाय असं कधी झालं नाही. देशातील इतर प्रादेशिक पक्षांपेक्षा ह्या पक्षाला मिळालेलं यश हे काहीसं उशिरा मिळालं आणि इतर प्रादेशिक पक्षांसारखं त्यांना महाराष्ट्रात एकहाती सत्तेत येता आलं नसलं तरी शिवसेना नावाच्या फोर्सची यशाची भाजणी ही चढती आहे हे नाकारता येणार नाही. शिवसेनेने जे मिळवलं आणि टिकवलं ह्याचं कौतुक करताना शिवसेनेला जे मिळवता आलं नाही, त्याकडे दुर्लक्ष करता येत नाही- १) शिवसेनेला स्वतःची वेगळी ओळख, ताकद आणि एक प्रचंड करिष्मा असलेला नेता प्रमुख म्हणून लाभला तरी त्याला इतर पक्षांसारखं दिल्लीत स्वतःचा जम बसवता आला नाही. २) त्यांना राजकीय लवचिकता आणता आली नाही. शिवसेना स्थापनेपासून संघटनाच राहिली, तिचा कधी पक्ष होऊ शकला नाही. जवळपास ५३ वर्ष एक विचार, संघटना म्हणून टिकवणं ही जरी कला अस...
Image
भारतीय जनता पक्षाचा मेगा डिस्काउंट सुरु? २०१४ ला भारतीय जनता पक्षाचे केंद्रात २८२ खासदार निवडून आले. एकदा इतके खासदार निवडून आल्यावर, ह्या आकड्याची आम्हाला खात्रीच होती इत्यादी दावे जरी त्या पक्षाच्या नेत्यांनी केले असले तरी त्यांना देखील ह्या आकड्याची खात्री नसणार हे नक्की. कारण आपण स्वतःच्या ताकदीवर २७५ चा आकडा गाठू शकतो ह्याची खात्री जर तेंव्हाच्या नेतृत्वाला, म्हणजे नरेंद्र मोदी ज्यांचं नाव पुढे करून भाजप निवडणूक लढवत होते त्या मोदींनी जवळपास देशातल्या निम्म्याहून राज्यात घटक पक्षांचं लोढणं अंगावर घेतलं नसतं. उत्तर प्रदेशात अपना दल सारखा अगदी छोटा पक्ष पण त्यांनी सामावून घेतला ह्यावरून जशी त्यांना खोटी सर्वसमावेशकता दाखवायची होती तसंच स्वबळावर येण्याचा कॉन्फिडन्स देखील नव्हता. १६ मे ला निकाल लागले, भारतीय जनता पक्षाचे २८२ खासदार निवडून आले आणि नरेंद्र मोदींचा नूर बदलला. भाजपच्या नेतृत्वाचा वारू चौफेर उधळला आणि एनडीएचं सरकार आलं असं जरी म्हणलं तरी ते भाजपचंच सरकार राहील ह्याची खबरदारी श्री. नरेंद्र मोदी आणि पुढे जाऊन श्री. अमित शाह ह्यांनी घेतली. एनडीएचे समनव्यक हे श्री. चं...
Image
राज ठाकरेंनी जर शिवसेना सोडलीच नसती तर...  १८ डिसेंबर २००५ ला म्हणजे बरोबर १३ वर्षांपूर्वी राज ठाकरेंनी शिवसेना सोडली. पण जर त्यांनी शिवसेना सोडलीच नसती किंवा समजा सोडली असती आणि त्यांनी किमान सक्रिय राजकारणातून सन्यास घेतला असता तर काय घडले असते? तुम्हाला हा प्रश्न आत्याबाईंनी मिश्या असत्या तर काय झाले असते, असा वाटेल पण भविष्यवेधी गोष्टींचा विचार करताना आधी घडलेली गोष्ट घडली नसती तर काय झालं असतं ह्याचा विचार करून बघावाच लागतो. आणि हा विचार करताना, मुख्यतः राज ठाकरेंच्या शिवसेना सोडण्याबद्दल सामन्यांच्या मनातला मतप्रवाह काय आहे ह्याचा जर कानोसा घेतला तर दोन उत्तरं येतात १) बाळासाहेबांच्या नंतर शिवसैनिकांनीच त्यांचं नेतृत्व राज ठाकरेंकडे सोपवलं असतं २) सध्याची शिवसेनेची बिचारी अवस्था झाली नसती. हे झाले दोन विचार जे राज ठाकरेंच्या शिवसेना सोडण्याभोवती फिरत असतात. म्हणजे शिवसैनिक नसलेल्याना देखील असं वाटत राहतं की राज ठाकरेंच्या व्यक्तिमत्वात शिवसेना नावाचा अंगार पुढे नेण्याची ताकद होती. मराठ्यांचं साम्राज्य हे पार अफगाणिस्तान पर्यंत नेऊन टेकवणाऱ्या, आणि स्वातंत्र्य चळवळ...
Image
वाजपेयीजी, ये दिल मांगे मोअर...  'ये दिल मांगे मोअर' हे पेप्सी कंपनीच्या १९९८ सालच्या कॅम्पेनचं घोषवाक्य (tagline). पेप्सी सारख्या कंपन्या ह्या टॅगलाईन पासून पूर्ण कॅम्पेन करताना, तात्कालीन राजकीय आणि सामाजिक परिस्थितीच्या अभ्यास करतात, टॅगलाईनचं टेस्टिंग करून बघतात आणि मगच ती कॅम्पेन बाहेर येते. १९९८ साली देशाचा काहीसा मूड हा 'ये दिल मांगे मोअर' असाच होता. भारतीय स्वातंत्र्याला पन्नास वर्ष नुकतीच पूर्ण झाली होती. आणि नरसिंहराव आणि मनमोहन सिंग ह्या जोडीने आणलेल्या उदारीकरणाच्या पर्वाला ७ वर्ष होऊन गेली होती. उदारीकरणाला विरोध करणारे आवाज बसायला लागले होते आणि उदारीकरणाने भारतात नवा मध्यमवर्ग उदयाला यायला सुरुवात झाली होती किंवा मी म्हणेन किमान त्यांची स्वप्न मोठी होऊ लागली होती. त्यावेळेस मला आठवतंय त्याप्रमाणे कॉलेजच्या अगदी पहिल्या वर्षी सुद्धा कॉलेजच्या मुलांमध्ये कॉमर्स ग्रॅज्युएट होऊन बँकेत नोकरी करण्यापेक्षा सीए होऊ, एमबीए होऊ किंवा अगदीच काही नाही तर एक्स्पोर्ट मॅनेजमेंट करू इत्यादी स्वप्न बघायला सुरुवात झाली होती. गळ्यात 'I am cool' असं काही तरी...

कारण ह्याला आपण प्रगती म्हणतो...

कारण ह्याला आपण प्रगती म्हणतो... माझं केस कापायचं सलून हे गेले ३३ वर्षं एकच आहे. सध्या डोक्यावर फारच थोडे केस उरले असले तरी ते वाढतात त्यामुळे अधून मधून कापायला जावं लागतंच.  माझा जन्म आणि पुढची ३३ वर्ष डोंबिवली शहरात गेली. आणि ह्या पूर्ण काळात मी ह्याच सलून मध्ये जातोय. डोंबिवली शहराच्या मध्य वस्तीत हे सलून आहे. गेल्या ३३ वर्षांत इथलं काहीच बदललं नाहीये. तेच जुनाट लाकडी फर्निचर, बऱ्यापैकी करकरणाऱ्या खुर्च्या, केस कापणारी माणसं तीच जी माझ्या आठवणीत २० वर्षांपूर्वी होती. सलून प्रमाणे म्हातारी होत गेलेली केस कापणारी ही माणसं आता तिथल्याच ब्रशने स्वतःचे केस काळे करत असतात आणि त्याच डुगडुगणाऱ्या लाकडी स्टुलावर बसून असतात. एवढ्या वर्षांत जर काही बदललं नसेल तर विविध भारतीचं रेडिओ स्टेशन. ५०, ६०, ७० च्या दशकातील गाणी सुरु असतात, आताशा ज्यांच्याकरता ही गाणी लावली जातात त्या गिऱ्हाइकांना ती फारशी परिचित नसतात आणि केस कापणाऱ्या ह्या गड्यांच्या कानावर ती पडतात का नाही इतक्या निर्विकारपणे त्यांचे हात यंत्रवत सुरु असतात. पूर्वी ही माणसं एकमेकांशी तरी बोलायची, गिऱ्हाइकांशी बोलायची पण आता ग...

वाटचाल 'अंकित' महाराष्ट्राच्या दिशेने....

Image
१ मे ला वसई येथील जाहीर सभेत राज ठाकरेंनी पालघर आणि ठाणे जिल्ह्यातल्या परप्रांतीयांच्या वाढत्या संख्येविषयी आणि त्यांच्या 'कब्जा' करण्याची वृत्ती मांडली होती. २००८ पासून हा मुद्दा राज ठाकरे मांडत आहेत, थोडक्यात जो धोका ते मांडत आहेत त्याच्या मांडणीला देखील दहा वर्षं पूर्ण झाली. मी काही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा समर्थक या भूमिकेतून हे लिहितोय असं नाही पण ते जे सांगत आहेत ते किती गंभीर आहे हे परवाच्या एका बातमीतून जाणवलं. पालघर लोकसभेची पोटनिवडणूक भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेने प्रतिष्ठेची केली आहे. सेनेने आमच्या पाठीत खंजीर खुपसला म्हणून त्याचा बदला घ्यायला भाजप आतुर आहे अश्या पद्धतीच्या बातम्या भाजप आयटी सेल कडून धाडल्या जात आहेत. तसं बघायला गेलं या लोकसभेचे फक्त ९ महिने शिल्लक राहिले आहेत, त्यात जर शेड्युल प्रमाणे मार्च २०१९ ला निवडणुकांचा पहिला टप्पा सुरु होणार असेल तर साधारणपणे फेब्रुवारी २०१९ च्या पहिल्या आठवड्यात आचारसंहिता लागेल आणि लोकसभेचं पावसाळी अधिवेशन अंदाजे जुलैत सुरु होईल, म्हणजे नवनिर्वाचित खासदाराचा शपथविधी तेंव्हाच होईल म्हणजे ही खासदारकी हीच औटघटकेची आहे....