Posts

जग भूकबळींच्या उंबरठ्यावर?

Image
 जग भूकबळींच्या उंबरठ्यावर? गेले काही दिवस पाश्चिमात्य माध्यमं एक भाकीत वर्तवत आहेत की जग भूकबळींच्या उंबरठ्यावर आहे आणि येत्या काही महिन्यात जगातील अनेक देशांमध्ये अन्नधान्याचा प्रचंड तुटवडा असणार आहे. अर्थात अशा कोणत्याही घटनेला कोणालातरी जबाबदार धरणं हे जगभरातील राज्यकर्त्यांचा काम असतं. तसं ह्या वेळेस व्लादीमीर पुतीन ह्यांना जबाबदार धरलं आहे. अर्थात कारण म्हणजे पुतिननी युक्रेनवर लादलेलं युद्ध.  वॉशिंग्टन पोस्टचा अंदाज आहे की जगभरातील २१९ दशलक्ष लोकं ही अन्नधान्याच्या अनिश्चिचिततेच्या छायेत (food insecure) जगत आहेत. थोडक्यात आज जेवण मिळालं उद्याच काय ह्या विवंचनेत जगत आहेत.  अगदी आपल्या शेजारचं उदाहरण आहे श्रीलंकेचं. श्रीलंकेत अन्नधान्याचा अभूतपूर्व तुटवडा आहे. आणि अर्थात राजपक्षे राजवट जशी त्याला जबाबदार आहे तसंच पुतीननी युक्रेनवर लादलेलं युद्ध पण.  युक्रेन हा जगातील अनेक देशांचा अन्नदाता आहे. श्रीलंका, येमेन, सुदान, लेबेनॉन, युगांडा, टांझानिया, इजिप्त, ट्युनिशिया, कॅमेरॉन सारखे देश शब्दशः युक्रेनमधून आयात होणाऱ्या धान्यावर अवलंबून असणारे देश आहेत. पुतीननी ब्लॅक ...

ऋतू

Image
 'महाराष्ट्रात पुन्हा एकदा उष्णतेची लाट'... 'तापमानाचा पारा चढताच राहणार'......   अशा बातम्या वाचल्या तरी मनाची घालमेल सुरु होते. अस्वस्थ व्हायला होतं. त्यात पर्यावरणाचा ह्रास कसा होतोय आणि हे किती गंभीर होत जाणार ह्या बातम्यांना आणि सोशल मीडियावरच्या पोस्ट्सना ऊत येतो. आणि वाढत्या उकाड्यामुळे शरीराची जी घालमेल होते त्यापेक्षा अधिक ह्या बातम्यांनी मनाची घालमेल सुरु होते, अस्वस्थता, अनिश्चितता ह्याच्या भोवऱ्यात मन अडकत आणि त्यातून सुटका करून घ्यायला हात नकळत एसीच्या रिमोटकडे जातात. मनाला उन्हाळ्याचा दाह कमी झाल्यासारखा वाटतो. पण हा दाह कमी होतो म्हणजे नक्की काय कमी होत असेल?  काही कमी होत नाही... माझी ह्या रखरखीपासून तात्पुरती सुटका करून घेऊ शकतो, आणि पुढच्या ऋतूची वाट पाहू शकतो जो इतका त्रासदायक ठरणार नाही ह्याची खात्री बाळगत निवांत राहू शकतो इतकंच.    ह्यावरून एक प्रसंग आठवला. भर मे महिन्यात एकदा दिल्लीहुन मुंबईला येत होतो. एक मित्र सोडायला आला होता दिल्ली एअरपोर्टला. वाटेत म्हणाला एका ठिकाणी दहीवडे खाऊ. सकाळी दहा वाजता दहीवडे खाण्याची तयारी दिल्लीकरच दाखवू शकत...

संवादाचा नवा नियंता

Image
 ट्विटरच्या ऑफिसमध्ये असं गमतीत म्हणलं जातं की ट्विटरच्या जगात रोज नवीन कथा जन्माला येत असतात, नवीन नायक जन्माला येत असतात.  त्या नायकांना कधी डोक्यावर बसवलं जातं तर कधी पायदळी तुडवलं जातं. कित्येकांचा मानसिक छळ केला जातो पण हे सगळं होत असताना ट्विटरच्या ऑफिसमध्ये बसलेल्या कोणीच त्या स्टोरीचा भाग व्हायचं नाही आणि नायक होण्याचा तर विचार पण करू नये. पण ट्विटरला एक नवीन मालक मिळणार आहे जो ट्विटरने घातलेले अनेक नियम पायदळी तुडवायला निघाला आहे आणि हे करताना स्वतः नायक न होण्याचा नियम तर त्याला कधीच मान्य होणार नाही. एलॉन मस्क, ४४ बिलियन डॉलर्स इतकी अवाढ्यव रक्कम मोजून ट्विटरवर ताबा मिळवायला निघाला आहे.  जगातील एक बलाढ्य आणि विश्वासार्ह मानलं जाणारं सोशल मीडिया माध्यम अशा एका व्यक्तीच्या ताब्यात जाणार आहे ज्याला नैतिक, सामाजिक संकेतांच्या चौकटीच मान्य नाहीत.  ही स्टोरी गेले काही दिवस भारतीय माध्यमांमध्ये देखील चर्चेत आहे पण ट्विटरचा सीईओ भारतीय असल्यामुळे त्याचं काय होणार आणि ४४ बिलियन डॉलर्सच्या व्यवहाराने विस्फारलेले डोळे ह्या पलीकडे भारतीय माध्यमं जायलाच तयार नाहीत. पाश...
Image
  ८ वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. ऑगस्ट क्रांती राजधानी एक्स्प्रेसने दिल्लीला जायला निघालो होतो. मुंबई सेंट्रलला गाडीत चढलो. साईड सीट मिळाली होती. सिटपाशी पोहचलो तर सीटच्या खाली आणि सीटवर बॅगा अस्ताव्यस्त पडल्या होत्या. थोडासा वैतागलो. तेवढ्यात एक माणूस आला. तेंव्हा तो पन्नाशीचा असावा. माझ्याकडे पाहिलं आणि म्हणाला "शायद आपको सीट ऍडजस्ट करना होगा, लेकिन अच्छी सीट मिलेगी।" असं म्हणाला आणि गायब झाला. आधीच मूड ऑफ होता, त्यात हा आदेश देणारा कोण म्हणून वैतागलो आणि ठरवलं की सीट नाही ऍडजस्ट करणार. हा कोण मला सांगणारा? गाडी सुटायच्या वेळेला हा गडी हजर. मला म्हणाला माझ्या सामानाकडे लक्ष ठेवा मी आलोच. गाडी सुटली. तो माणूस परत आला. हातात खायचं सामान घेऊन आला होता. ते सीटवर ठेवून स्वतःच्या बॅगा नीट ठेवल्या, माझी बॅग पण ठेवली. पॅन्ट्रीवाल्याला परस्पर सांगितलं की ह्यांचा आणि माझा स्नॅक्स आणू नकोस. मला त्याच्या आगाऊपणाचा राग आला आणि थोडं कुतूहल पण वाटलं. कचोरी, सामोसे, जिलबी असा पॅक्ड नाश्त्याचा एक डबा माझ्या हातात ठेवला. स्वतः खायला सुरुवात केली. त्याचं खाणं देखणं होतं. अगदी तल्लीन होऊन. मध्येच...

Acceptance/ स्वीकार'

Image
 काही वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. भारतीय सैन्यावर एक डॉक्युमेंट्री बनवायला म्हणून आम्ही काश्मीरला गेलो होतो. चंदिगढ ते मीरपूर असा प्रवास कारने करत रात्री आम्ही उशिरा आर्मी गेस्टहाऊसला पोहचलो. कडक उन्हाळ्याचे दिवस होते. गेल्या गेल्या आर्मीतील काही अधिकाऱ्यांनी स्वागत केलं, आणि आणि आम्हाला जेवायचं आमंत्रण दिलं.  जेवायला बसलो. जेवण वाढणारा अर्थात आर्मीतला एक जवान होता. सहा फुटापेक्षा जास्त उंची आणि पिळदार शरीर. अत्यंत प्रेमाने गरमगरम फुलके वाढत होता. मध्ये मध्ये आग्रह करत होता. दुसऱ्या दिवशी नाश्त्याच्या वेळेस पण तोच वाढायला. चेहऱ्यावर हास्य कायम. रात्री जेवायला बसलो तेंव्हा पुन्हा हसतमुख चेहऱ्याने आम्हाला जेवण वाढत होता. आग्रह करणं सुरूच होतं. जेवण झालं. मग बाहेर मोकळ्यावर फिरत होतो तेवढ्यात तो बाहेर आला, आम्ही दुसऱ्या दिवशी पुढच्या प्रवासाला निघणार होतो म्हणून त्याचे आभार मानले, तो ही छान गप्पा मारत होता. त्याला सहज विचारलं की "आर्मी मेसमे कितने सालों से काम कर रहें हो ". तर म्हणाला "३,४ सालों से." वयाचा अदमास घेतला तर हा तसा वयाने मोठा वाटत होता, माझ्या डोक्यात चक्र फ...

काहीही न करता !

Image
  बारावीची परीक्षेला अवघे काही आठवडे राहिलेले असताना आमच्या फॅमिली डॉक्टरनी विचारलं, सुट्टीत काय करणार? म्हणलं काही ठरलं नाही. तर म्हणाले छान उगाच ठरवत बसण्यात एनर्जी कशाला घालवायची. मग म्हणाले की 'विपश्यनेला' जा. काय असतो हा प्रकार हे फार त्यांनी खोलात जाऊन सांगितलं नाही. एवढंच कळलं की बोलायचं नाही १० दिवस.   परीक्षा झाली आणि तात्काळ विपश्यनेला गेलो. पहिल्याच दिवशी संध्याकाळी कोणीच कोणाशी बोलायचं नाही अशी शपथ घ्यायला लावली. आणि मग विपश्यना शिकवायला सुरु केलं. दिवसभर तसं काहीच करायचं नाही असं म्हणलं तरी चालेल, विपश्यनेची साधना करायची. म्हणजे काय तर दिलेल्या जागी बसायचं, डोळे मिटायचे आणि शरीरात होणारे बदल अनुभवायचे. माझ्या वाट्याला आलेले गुरु पण मस्त होते. त्यांना मज्जा वाटली की  १८ वर्षांचा मुलगा विनातक्रार येऊन बसतो. मला म्हणाले की डोळे नाही मिटावेसे वाटले तरी हरकत नाही. नुसतं बसून रहावसं वाटलं तरी चालेल. म्हणलं हे भारी आहे.  ते १० दिवस भुर्रकन उडून गेले. पुढे कॉलेज, मास्टर्सचं शिक्षण, नोकऱ्या सगळं सुरु झालं पुन्हा अशी संधी आलीच नाही. हां एक फायदा नक्की झाला त्या १०...

पेगासस अदृश्य पण अघोरी हेर

Image
 ketalaytics च्या आजच्या ह्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं मनापासून स्वागत. आजचा विषय आहे पेगासस.  पेगासस सॉफ्टवेअर भारताने विरोधकांवर वापरलं का नाही वापरलं ह्यावर भारतात  चर्चा सुरु असताना हे प्रकरण नक्की काय आहे? आणि हे किती खोल आहे हे समजवून घ्यावं लागेल. बातमी मागची बातमी समजून नाही घेतली तर उपयोग काय. आणि हेच तर ketanalytics चं काम आहे. चला तर मग पेगाससचा शोध घेऊया.  न्यूयॉर्क टाइम्सने २८ जानेवारी २०२२ च्या अंकात 'The Battle for the World's Most Powerful Weapon' ह्या अतिदीर्घ लेखात पेगासस हे इस्रायली सॉफ्टवेअर  वापरून भारत सरकारने भारतातील अनेकांचे मोबाईल्स हॅक करून त्यातून अत्यंत खाजगी माहिती, फोटोज, लोकेशन्स, अशी अनेक माहिती मिळवली असा आरोप केला. त्यावर अर्थातच विरोधी पक्षात असलेल्या काँग्रेसने सरकारला जाब विचारला. पण ही बातमी पुढे फारशी कुठे चर्चेत आली नाही. अर्थात न्यूयॉर्क टाइम्स हे कसं भारतद्वेष्ट वर्तमानपत्रं आहे ह्याचे मेसेजेस पसरवले गेले. आणि जणू काही न्यूयॉर्क टाइम्सने त्यांच्या ह्या अतिदीर्घ लेखांत फक्त आणि फक्त भारताबद्दलची माहिती लिहून त्यांची बदनामी ...