Posts

मराठी पाऊल का अडखळते ?

Image
  'मराठी माणसाच्या महत्वकांक्षा बोथट झाल्या आहेत का?', 'बरं चाललं आहे की, कितीही मिळालं तरी कमीच असतं' ह्या विचारपद्धतीत मराठी माणूस अडकला आहे का ?,   'उत्तुंग काही तरी करावं, घडवावं अशी एकूणच मराठी समूह मनाची इच्छाच संपली आहे का?'  लेखाच्या सुरुवातीलाच तीन प्रश्न जे काहीसे अप्रिय, आणि राग आणणारे वाटतील पण एकूणच चित्र बघितलं तर हे मान्य करायला कितीही जड गेलं ,तरी हे वास्तव आहे. काहीतरी मिळवण्याच्या किंवा घडवण्याच्या महत्वकांक्षेच्या स्पर्धेत एकूणच मराठी समाज मागे पडत चालला आहे.  ह्यात आत्ता अगदी सुरुवातीलाच सांगतो की जे जे मुद्दे मी उपस्थित करणार आहे, त्यात सन्माननीय अपवाद आहेत आणि त्या माणसांविषयीचं कौतुक आणि कृतज्ञता हे दोन्ही आहे. पण म्हणून प्रत्येक क्षेत्रांत हाताच्या बोटावर मोजण्याइतके लोकं हेच जर आपलं यश मानत असू तर मात्र मराठी समूहमनाला आत्मपरीक्षणाची गरज आहे.  ह्यात मराठी म्हणजे कोण, इथे पिढ्यानपिढ्या राहिलेले, वालचंद परिवार, फिरोदिया, बजाज ह्यांना आपण मराठी मानून आणि ते कसे उत्तम मराठी बोलतात इत्यादी बाबींवर समाधान मानून त्यांना आपलं म्हणा, ह्या खटपटीत ...

उजव्या लाटेचा सांगावा

Image
  एक २५ वर्षांपूर्वी ऑस्ट्रियाच्या 'फ्रीडम पार्टी ऑफ ऑस्ट्रिया'ने जेंव्हा १९९९ च्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये २७% मतं मिळवली आणि ते पुढे तिथल्या सरकारचा भाग बनले तेंव्हा संपूर्ण युरोपातच नाही तर पार अमेरिकन राजनय (डिप्लोमॅटिक) जगात हाहाकार माजला होता. व्हिएन्नाशी राजकीय संबंध तोडून त्यांच्यावर काही निर्बंध पण लादले होते. अगदी आत्तापर्यंत, म्हणजे एक १० वर्षांपूर्वी पर्यंत ऑस्ट्रियन नागरिक मी 'फ्रीडम पार्टी ऑफ ऑस्ट्रिया' चा मतदार आहे हे सांगताना काहीसा कचरायचा. पण ह्या पक्षाचं ध्येय धोरण हे आता ऑस्ट्रियन राजकारणात अगदीच रुळायला लागलं आहे. 'फ्रीडम पार्टी ऑफ ऑस्ट्रिया' चा सरळसरळ झुकाव हा हिटलरच्या नाझी विचारसरणीशी आहे आणि ह्या पक्षाचे पूर्वीचे नेते हे तर हिटलरच्या 'एसएस' ह्या निमलष्करी दलातील अधिकारी होते.   फ्रान्समध्ये 'नॅशनल रॅली' (आधीचा 'नॅशनल फ्रंट') ह्या पक्षाच्या जिन-मेरी -ल-पेन ह्यांच्यासोबत तेंव्हाचे फ्रान्सचे अध्यक्ष म्हणून निवडून आलेल्या जॅक शीरॅक ह्यांनी तर, निवडणुकीच्या आधीच्या चर्चांमध्ये 'नॅशनल फ्रंट' सारख्या अतिउजव्या ...

सहानभूती? नो वे...

Image
 'Stop playing victim in situations you’ve created and then flip the story to manipulate people to think you’re innocent.' अज्ञात...  व्हिक्टीम कार्ड खेळणारे आणि त्या आड स्वतःच्या मर्यादांना लपवणारी माणसं तुम्ही मी सगळ्यांनी पाहिली असतील. स्वतः कडच्या एखाद्या अभावाचं किंवा स्वतःवर झालेल्या अन्यायाचं सातत्याने प्रदर्शन करून लक्ष वेधणारी माणसं ही जास्त धोकादायक असतात. ती धोकादायक अशासाठी असतात की ती तुम्हाला त्यांच्याबद्दल स्वतंत्र विचार करायला देत नाहीत. ह्यासाठी त्यांच्याकडे अन्यायाच्या, अभावग्रस्तपणाच्या कथांचा संग्रहच असतो. आपण सगळे जण कमी जास्त फरकाने ह्या सगळ्याला बळी पडतो आणि हे करताना स्वतःच एक खूप महत्वाचं नुकसान करून घेतो ते म्हणजे नकळतपणे 'कॉम्पिटिटिव्ह स्पिरिट' ह्या कल्पनेला आपण छेद देतो. आणि अशांच्या गराड्यात जर अडकलो तर तुमच्या आयुष्यातील उतार सुरु होणार हे नक्की. (यशस्वी माणसं, यशस्वी माणसांच्या गराड्यात का राहू इच्छितात ह्याचं कारण हेच असावं की त्यांना त्यांच्या रोज स्पर्धा करायची आहे ह्या भिनवलेल्या तत्वाला कुठेही भेग पण पडू नये असं वाटत असावं.) काल सन्मा...
'नॉस्टॅलजिया' हा शब्द ऐकला की छे ते दिवस, छे त्या आठवणी, असं म्हणत तो बंद झालेला कप्पा असं सर्वसाधारणपणे मानण्याचा कल आहे. जुन्या आठवणी, जे हरवलं आहे ते पुन्हा मिळणार नाही ह्याची खात्री बाळगत, आता कशाला पुन्हा दुःखाला ऊत आणा ही एकूणच धारणा. पण'नॉस्टॅलजिया'ची पण एक ताकद असते, ती तुम्हाला पुन्हा तरुण करू शकते, एकत्र जोडू शकते हे मी नुकतंच अनुभवलं.  'गतवैभवात रमू नका' असं म्हणणाऱ्या मला पण माझ्या धारणा किती चुकीच्या आहेत ह्याची जाणीव करून दिली. शिवेंद्रसिंह डुंगरपूर नावाचे एक गृहस्थ, सिनेमाची उत्तम समज असलेले, स्वतः काही सिनेमे, जाहिरातींचं, डॉक्युमेंट्रीजचं दिग्दर्शन केलेली व्यक्ती. गेली अनेक वर्ष विस्मरणात ढकललेल्या किंवा निर्मात्यांकडून गहाळ झालेल्या किंवा त्यांची नीट देखभाल न झालेल्या सिनेमांची रीळ घेऊन येतात, त्यावर काम करून त्यांचं डिजिटायझेशन करतात, ह्यासाठी देशाच्याच नाही तर अगदी दक्षिण आशियातील कुठल्याही कोपऱ्यात त्यांना अशी रीळ आहेत असं कळलं तर त्यांची टीम तिकडे पोहचते, ती रीळ ताब्यात घेऊन ती जितकी वाचवता येतील, पुन्हा प्रेक्षकांपर्यंत नेण्याच्या लायकी...

सर !

ग्रॅज्युएशन नंतर पुणे विद्यापीठात मास्टर्ससाठी अर्ज केला तेंव्हा सर्वप्रथम लेखी परीक्षा, मग ग्रुप डिस्कशन, मग मुलाखत असे सगळे सोपस्कार होते. ह्या सोपस्कारांचा एक एक टप्पा पार करत जात असताना मुलाखतीच्या वेळेस समोर मुलाखत घेणारे सगळेच म्हातारे बसले होते. पण त्यात एक पांढरी शुभ्र दाढी असणारा माणूस मात्र, उत्तर ऐकताना खूप काळजीपूर्वक ऐकतोय, मध्येच गालात नाही म्हणता येणार कारण भरघोसदाढी असल्यामुळे दाढीत हसतोय हे जाणवत होतं. पुढे पुणे विद्यापीठात निवड झाल्याचं कळलं मग पुण्याला जायची तयारी सुरु झाली. विद्यापीठात दाखल झालो. आणि तिसऱ्या दिवशी सकाळी ९ वाजता अचानक त्या दाढीवाल्या बाबाने वर्गात प्रवेश केला. त्यांची वर्गातील एंट्री काहीशी वादळीच होती. ते धाडकन वर्गात आले, स्वतःच्या हातातील बॅग खाली ठेवली. फळ्यावर लिहायला सुरुवात केली. त्याचा अर्थ असा काहीसा होता की 'ह्या पुढे जे काही तुम्हाला कळेल/कानावर पडेल ते प्रत्येक योग्यच असेल असं नाही त्यामुळे प्रत्येक टप्प्यावर प्रश्न विचारा.' हे काहीतरी नवीनच होतं, प्रश्न विचारा? प्रश्न विचारू नका हेच तर ऐकत आलोय आपण. त्यांनी दुसरी गोष्ट ...

चष्मेबहाद्दूर

Image
  मी पाचवीत असताना शाळेत जरा मागच्या बाकांवर बसायचो. एकूणच शाळेत किंवा कॉलेजमध्ये किंवा कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमात मागे बसण्याची मजा औरच. मुळात पुढे बसणं म्हणजे शिक्षकांपासून ते वक्त्यांपर्यंत सगळ्यांचं लक्ष वेधून घेतोय असं वाटतं, त्यापेक्षा आपली तंद्री लावायची असेल तर मागचे बाक बरे.   पण अचानक फळ्यावरचं दिसेनासं झालं, मग जरा डोळे ताणून बघ, शेजारच्याच्या वहीत डोकं घाल, असे प्रकार केले, पण एका शिक्षकाच्या लक्षात आलं, त्यांनी डोळे तपासून यायला सांगितलं. पण तोपर्यंत पुढच्या बाकावर बसायला सांगितलं.    घरी येऊन ही बातमी सांगितली. तात्काळ डोळ्याच्या डॉक्टरकडे नेलं गेलं. मला तोपर्यंत काय पुढे वाढून ठेवलं आहे ह्याचा अंदाज आला होता. डोळ्यावर तो एक लोखंडी जड चष्मा ठेवला आणि वाचायला सुरु करायला सांगितलं. चष्मा लागू नये म्हणून मी फार एकाग्रतेने अक्षरं वाचायला सुरु केली. पण जसं जसं ते पुढे जायला लागले आणि अक्षरांचा आकार छोटा व्हायला लागला, म्हणलं मेलो आता ! करा मान्य, लागला चष्मा. मग शांतपणे ते जे काही काचा बदलत जादूचे प्रयोग करत होते, ते सहन करत, चष्मा लागला आहे ही बातमी ऐक...

सिनेमाचं मंदिर

Image
  अगदीच महिना-वर्ष सांगायचं झालं तर ऑगस्ट २००२. पुण्यात मी मास्टर्सला शिकायला होतो, तेंव्हाची गोष्ट. आम्हाला सिनेमा हा विषय शिकवायला एक प्रोफेसर होते. सिनेमाच काय पण जवळजवळ सगळ्या कलाप्रकारांचा गाढा अभ्यासक. पण फक्त अभ्यासक नाही तर स्वतःचा अभ्यास शिकवण्याची/उलगडून दाखवण्याची कमालीची क्षमता असलेले हे आमचे प्रोफेसर. तर असंच ऑगस्ट महिन्यातल्या एका रविवारी संध्याकाळी, रिमझिम पाऊस पडत होता. आम्ही ४ मित्र ह्या प्रोफेसरांसोबत 'कमला नेहरू पार्क' येथे गप्पा मारत होतो. तेवढ्यात त्यांनी विचारलं की किती वाजले असतील. आम्ही म्हणलं ६. तर म्हणाले चला मला जावं लागेल, तुमचा काय प्लॅन आहे? काही विशेष नसेल तर चला माझ्यासोबत.   त्यांनी एक पत्ता सांगितला, आमच्यापैकी एका मित्राला तो माहित होता. आमचे प्रोफेसर पुढे गेले आणि आम्ही चालत चालत त्यांनी सांगितलेल्या पत्त्यावर आलो. एक बैठी वास्तू.काहीशी जुनी दिसणारी, बाहेर लोकं रांगेत उभी होती. संस्थेचा बोर्ड पाहिला तर कळलं की ह्याला 'नॅशनल फिल्म आर्काइव्ह' म्हणतात. म्हणजे नक्की काय असेल कळलं नाही. पण गर्दीच्या सोबत आत गेलो. आमच्या सरांनी खूण केली की ...