उजव्या लाटेचा सांगावा

एक २५ वर्षांपूर्वी ऑस्ट्रियाच्या 'फ्रीडम पार्टी ऑफ ऑस्ट्रिया'ने जेंव्हा १९९९ च्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये २७% मतं मिळवली आणि ते पुढे तिथल्या सरकारचा भाग बनले तेंव्हा संपूर्ण युरोपातच नाही तर पार अमेरिकन राजनय (डिप्लोमॅटिक) जगात हाहाकार माजला होता. व्हिएन्नाशी राजकीय संबंध तोडून त्यांच्यावर काही निर्बंध पण लादले होते. अगदी आत्तापर्यंत, म्हणजे एक १० वर्षांपूर्वी पर्यंत ऑस्ट्रियन नागरिक मी 'फ्रीडम पार्टी ऑफ ऑस्ट्रिया' चा मतदार आहे हे सांगताना काहीसा कचरायचा. पण ह्या पक्षाचं ध्येय धोरण हे आता ऑस्ट्रियन राजकारणात अगदीच रुळायला लागलं आहे. 'फ्रीडम पार्टी ऑफ ऑस्ट्रिया' चा सरळसरळ झुकाव हा हिटलरच्या नाझी विचारसरणीशी आहे आणि ह्या पक्षाचे पूर्वीचे नेते हे तर हिटलरच्या 'एसएस' ह्या निमलष्करी दलातील अधिकारी होते. फ्रान्समध्ये 'नॅशनल रॅली' (आधीचा 'नॅशनल फ्रंट') ह्या पक्षाच्या जिन-मेरी -ल-पेन ह्यांच्यासोबत तेंव्हाचे फ्रान्सचे अध्यक्ष म्हणून निवडून आलेल्या जॅक शीरॅक ह्यांनी तर, निवडणुकीच्या आधीच्या चर्चांमध्ये 'नॅशनल फ्रंट' सारख्या अतिउजव्या ...